नागपूर,
Samruddhi highway-toll tax समृद्धी महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांना 1 एप्रिल पासून जास्त टोल शुल्क भरावे लागणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) समृद्धी महामार्गाचा टोल दर 19 टक्क्यांनी वाढणार आहे. त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे. येत्या 1 एप्रिलपासून नवे दर लागू करण्यात येणार आहे.
Samruddhi highway-toll tax येत्या 1 एप्रिलपासून कार आणि हलक्या वाहनांसाठी (लाईट मोटर व्हेईकल) प्रति किलोमीटर 2.06 रुपये टोल आकारला जाईल.मिनी ट्रक आणि मिनी बससाठी 3.32 रुपये प्रति किलोमीटर टोल आकारला जाणार आहे. पुढील तीन वर्षांसाठी म्हणजेच 31 मार्च 2028 पर्यंत नवे दर लागू राहातील. त्याचबरोबर डबल एक्सेल असलेल्या म्हणजेच चार किंवा सहा चाकांच्या बस आणि ट्रकसाठी 6.97 रुपये प्रति किलोमीटर टोल दर निश्चित करण्यात आला आहे.
Samruddhi highway-toll tax कन्स्ट्रक्शनसाठी वापरण्यात येणाऱ्या जेसीबी किंवा ट्रेलरसाठी 10.93 रुपये प्रति किलोमीटर पथकर आकारला जाणार आहे, तर सात किंवा त्याहून अधिक एक्सेल असलेल्या वाहनांसाठी 13.30 रुपये प्रति किलोमीटर टोल आकारण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ( MSRDC) अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Samruddhi highway-toll tax समृद्धी महामार्गतील पूर्ण रस्ता अद्याप झालेला नाही. 701 किलोमीटरच्या या पूर्ण मार्गावरील फक्त 625 किलोमीटरचा मार्ग सुरू झाला आहे. आता येत्या महिन्याभरात इगतपुरी ते आमने हा उर्वरित 76 किलोमीटरचा मार्ग सुरु होणार आहे. मात्र त्यापूर्वीच एमएसआरडीसीने टोलवाढीचा निर्णय घेतला आहे.यामुळे समृद्धी महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे.