नागपूर ,
State level sports competition दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे, क्रिडा संचलनालय,स्व. प्रभाकरराव दटके स्मृती संस्था नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग मुला-मुलींच्या राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धा घेण्यात आली होती.ही स्पर्धा ईश्वर देशमुख शारीरीक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रागंणातआयोजित करण्यात आली होती .
कर्णबधिर विद्यालय, सोनेगांव, नागपूरची विद्यार्थीनी प्राप्ती सुनिल भुरे हिने गोळा फेक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकविला. प्राप्तीचा गोळा फेकचा सराव विद्यालयातील शिक्षक अरूण दुभाषे यांनी घेतला होता .State level sports competition या यशाबद्दल प्राप्तीचे राष्ट्रीय अपंग कल्याण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत कलोती, महासचिव दिलीप धोटे, उपाध्यक्ष अरूण कुळकर्णी, सचिव डाॅ. वर्षा ठाकरे, सदस्य अनंत नाईक विद्यालयाच्या प्राचार्या हर्षदा पोफळी यांनी अभिनंदन केले.
सौजन्य:अनंत नाईक,संपर्क मित्र