खुशियों का सन्मानने प्रेक्षक सुखावले

    दिनांक :23-Mar-2025
Total Views |
नागपूर ,
Hindi Morbhavan Birdy विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या वतीने नवोदितांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या हेतूने बर्डी येथील हिंदी मोरभवनच्या उत्कर्ष हॉल मध्ये 'उभरते सितारे' या कार्यक्रमाचे आयोजन नियमित केल्या जाते. 'खुशियों का सन्मान' या अंतर्गत ज्ञानवर्धक आणि मनोरंजनात्मक तसेच संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी, मध्य रेल्वेचे नियंत्रक आणि गायक संजय जोशी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संयोजक युवराज चौधरी यांनी संजय जोशी यांचे स्वागत केले.उपस्थित विद्यार्थ्यांशी हितगुज साधतांना आपल्या मार्गदर्शन पर भाषणात ते म्हणाले ''आपण नकारात्मक विचार दूर सारून मानवीय मूल्यांची जपणूक केली पाहिजे.''याप्रसंगी त्यांनी गायक किशोर कुमारने गायलेले गीत प्रस्तूत केले .


boy 
 
 
 आपल्या प्रस्तावनेत सहसंयोजिका वैशाली मदारे यांनी संस्थेच्या उपक्रमा विषयीची माहिती दिली. यानंतर सहभागी विद्यार्थ्यांनी आप-आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले.Hindi Morbhavan Birdy याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. त्यात रुंजन राऊत हिने सूंदर चित्र रेखाटले. संपूर्णा रेमंडल हिने कविता सादर केली.जान्हवी जामगडे, देवांशी पटनायक, जानकी देवानी, शिव भूतडा, अर्चिता लखोटे, श्रिशिका वाघमारे, यांनी गीत सादर केली.स्वाती काळे, वासंती मिश्रा, शिवानी लुहा, भारत गुप्ता, मीनाक्षी केसरवानी, चित्रलेखा दुपारे, प्रशांत शंभरकर इत्यादी कार्यक्रमात सहभागी झाले होत.
सौजन्य: गजेंद्र डोळके,संपर्क मित्र