नागपूर,
Mhalgi Nagar लोकमंच ज्येष्ठ नागरिक मंडळ, म्हाळगी नगरच्या विद्यमाने स्वातंत्र्य संग्राम सैनिक काॅलनी मधील शिवाजी पार्क येथे बलिदान दिनच्या निमित्ताने निसर्ग फॅमिली क्लिनिकच्या सौजन्याने ज्येष्ठ नागरिकांची मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी मोफत करण्यात आली. शिबीर मध्ये ब्लड प्रेशर, शुगर, पी.आर.पी. थेरेपी, ऍक्ने ट्रिटमेंट आदी विषयांवर मार्गदर्शन केले. महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ, फेस्काॅम पूर्व विदर्भ प्रादेशिक विभागचे सचिव डॉ. दीपक शेंडेकर यांच्या शुभहस्ते शिबीराचे उद्घाटन झाले.

लोकमंच ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष कॅप्टन प्रभाकर विंचुरकर, हनुमान मंदिर पंच कमेटीचे अध्यक्ष रमेश साठवणे प्रामुख्याने उपस्थित होते. निसर्ग फॅमिली क्लिनिकचे डाॅ. कल्याणी पेटकर, डॉ. अनिकेत अबळंकर, अजमद हुसैन, स्वप्निल साठवणे यांनी सेवा प्रदान केली. Mhalgi Nagar शिबीराला प्रल्हाद शेंडे, ईश्वर वानकर, अशोक पाचपोर, हरेश्वर सहारे, काशिनाथ गुमगांवकर, प्रभुनाथ खापेकर, डॉ. चंद्रशेखर पाध्ये, सोमेश्वर आंभोरे, तनूजा विंचुरकर, वंदना खोडे, सुनिता गुडधे, कमल नेहारे, प्रतिभा चौधरी, लता दांडेकर, मीना आदमने, सुभाष पौनीकर आदींची उपस्थिती होती.
सौजन्य: दीपक शेंडेकर, संपर्क मित्र