यवतमाळच्या प्राध्यापकाची धामणगावात आत्महत्या

professor-suicide सुसाईड नोटमध्ये ३५ जणांची नावे

    दिनांक :24-Mar-2025
Total Views |
धामणगाव रेल्वे, 
 
 
professor-suicide यवतमाळ शहरातील लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालातील प्राध्यापकाने मालगाडीखाली उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी पहाटे येथे घडली. प्रा. संतोष भास्करराव गोरे (वय ५४, रा. रेवती हॉटेलच्या मागे यवतमाळ) असे प्राध्यापकाचे नाव आहे. professor-suicide ते यवतमाळच्या लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयात प्राध्यापक होते. गोरे यांच्या विरोधात एका प्राध्यापिकेने व्यवस्थापनाकडे तक्रार नोंदविली होती. या प्रकरणाची चौकशी होवून व्यवस्थापनाने त्यांना क्लिन चिट दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
 
 
 
professor-suicide
 
 
professor-suicide गेल्या काही दिवसांपूर्वी प्रा. गोरे यांनी आपल्या पत्नीला पुणे येथे पाठविले होते. पाच दिवसापासून ते नैराश्येत होते. दरम्यान गोरे यांनी सोमवारी पहाटे धामणगाव रेल्वे येथे मालगाडी खाली येवून आत्महत्या केली. सदर घटना रेल्वे विभागाच्या कर्मचार्‍यांच्या लक्षात येताच त्यांनी चौकशी सुरु केली. आयकार्डच्या बेल्टवरून मृतक हे यवतमाळ येथील अणे महाविद्यालातील इंग्रजी विषयाचे प्राध्यापक असल्याचे समजले. professor-suicide बडनेरा रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. रेल्वे प्रशासनाने महाविद्यालयात संपर्क साधून घटनेची माहिती दिली. घटनास्थळावर मृत्युपूर्व लिहलेले चिठ्ठी सापडली असून त्यामध्ये ३० ते ३५ जणांची नावे असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रा. गोरे यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व बराच मोठा आप्त परिवार आहे.