‘शिवं भावे जीवं सेवा’ हे संकल्प घेऊन कार्य करा

24 Mar 2025 10:13:56
गोंदिया, 
Padma Shri Dr. Vilas Dangre आपल्या राष्ट्राची, समाजाची, आपल्या देशाची सेवा करण्यासाठी आदरणीय बाळासाहेबांनी मला ‘शिवं भावे जीवं सेवा’ हे मंत्र दिले व ते करण्याचे कार्य मी निरंतर करीत असून आपल्या संकल्पाला पूर्ण रुपेन पूर्ण करू शकलो आहे. भविष्यात होमियोपॅथी चिकित्सा पद्धतीला समाजासाठी, राष्ट्रासाठी, मानवतेसाठी, संपूर्ण विश्वात पोहचविण्यात मी समर्थ राहिल, होणार आणि त्यासाठी संपूर्ण जीवन त्याग करणार असा विश्वास मी देत असून होमियोपॅथीच्या माझ्या सर्व विद्यार्थ्यांनी, डॉक्टरांनी मनात कसालाच संशय, भिती न बाळगता होमियोपॅथी उपचार पद्धतीचा उपयोग करावा असा मंत्र नरकेसरी प्रकाशनचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. विलास डांगरे यांनी दिला.
 
 
Padma Shri Dr. Vilas Dangre
 
स्थानिक गोंदिया होमियोपॅथीक कॉलेज अँड हॉस्पिटलच्या वतीने २३ मार्च रोजी डॉ. डांगरे यांचा सत्कार समारंभ व माजी विद्यार्थी मेळावाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. प्रसंगी महाविद्यालयाचे संचलक धीरज अग्रवाल, प्राचार्य हर्षा कानतोडे, डॉ. योगेश डोये आदी उपस्थित होते. पुढे डॉ. डांगरे म्हणाले की, अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेदीक उपचार पद्धतींच्या प्रती माझ्या मनात दुराग्रह कधीच नव्हता किंवा नाही. मात्र, माझ्या उपचार पद्धतीबाबत माझा आग्रह राहिला आहे. माझ्या उपचार पद्धतीवर कुणीही बोट उचलणार नाही, यासाठी मी परिश्रम घेतले. केवळ माझा रुग्ण बरा व्हावा, त्याला न्याय मिळावा हेच ध्येय बाळगून परिश्रम केले. Padma Shri Dr. Vilas Dangre आणि देवाच्या, आई-वडीलांच्या कृपेने व राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या विचारांच्या आशिर्वादाने मी माझ्या होमियोपॅथी उपचार पद्धतीला त्या स्थानावर घेऊन जाईल की, लोक फक्त पाहत राहतील असा माझा संकल्प पुर्णरुपेन पूर्ण केले. प. पु. बाळासाहेबांनी जे मंत्र मला दिले ते पूर्ण करण्यासाठी मी निरंतर कार्य करीत असून त्या मंत्राला साक्षात रुपाने या समाजाला सर्व सेवा समर्पित करीत असल्याचे ते म्हणाले. शेवटी त्यांनी ‘करता आले तर करून पहावे, जगता आले तर जगून पहावे, आपूले अश्रू सर्वच पुसतात, इतरांचे अश्रू पुसून पहावे’. हे जीवनातील सत्यता आहे. आणि याच मंत्राला आपल्या जीवनात उतरावे व आपला जीवन सार्थक करावे, असा सल्ला त्यांनी दिला. यावेळी मोठ्या संख्येत गोंदिया होमियोपॅथी कॉलेजचे आजी-माजी विद्यार्थी डॉक्टर उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0