यवतमाळचे प्रा. संताेष गाेरे यांची धामणगावात रेल्वेखाली आत्महत्या

25 Mar 2025 17:03:30
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
Santosh Gore : यवतमाळच्या लाेकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालातील इंग्रजीचे प्राध्यापक संताेष भास्कर गाेरे (वय 54, सृष्टी अपार्टमेंट, रेवती हाॅटेलच्या मागे, यवतमाळ) यांनी साेमवार, 24 मार्चच्या पहाटे मालगाडीसमाेर उडी घेऊन आत्महत्या केली.
 
 
 
GORE
 
 
काही दिवसांपूर्वी प्रा. गाेरे यांनी आपल्या पत्नी व मुलाला पुणे येथे पाठविले हाेते. पाच दिवसांपासून नैराश्यात हाेते. ही घटना रेल्वे कर्मचाèयांच्या लक्षात येताच रेल्वे पाेलिसांनी चाैकशी सुरू केली. बडनेरा रेल्वे पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रा. गाेरे यांच्या खिशातील ओळखपत्रावरून ओळख पटताच रेल्वे प्रशासनाने महाविद्यालयात संपर्क साधून या घटनेची माहिती दिली.
 
 
घटनास्थळावर चिठ्ठी (सुसाईड नाेट) सापडली असून, त्यामध्ये 30 ते 35 जणांची नावे लिहिली असल्याची माहिती आहे. प्रा. संताेष गाेरे यांच्या विराेधात एका महिला प्राध्यापकाने व्यवस्थापनाकडे तक्रार केली हाेती. या प्रकरणाची चाैकशी हाेऊन व्यवस्थापनाने प्रा. गाेरे यांना ‘क्लिन चिट’ दिल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.
 
 
प्रा. संताेष गाेरे यांच्यामागे पत्नी, एक मुलगा आणि माेठा परिवार आहे. या घटनेची माहिती हाेताच यवतमाळातील शिक्षण क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली. साेमवारी दिवसभर या घटनेमुळे समाजमन ढवळून निघाले असून या अभ्यासू आणि अजातशत्रू शिक्षकाच्या अशा मृत्युबद्दल हळहळ व्यक्त हाेत हाेती.
Powered By Sangraha 9.0