नॅराेगेज शकुंतला ब्राॅडगेज व्हावी!

26 Mar 2025 04:41:09
वेध
 
 
- गिरीश शेरेकर
 
shakuntala railway पश्चिम विदर्भातल्या वऱ्हाडची त्याकाळी जीवनरेखा ठरलेली शकुंतला रेल्वे 25 डिसेंबर 1903 राेजी सुरू झाली हाेती. यवतमाळ ते मूर्तिजापूर आणि मूर्तिजापूर ते अचलपूर अशा दाेन टप्प्यांत ही रेल्वे धावायची. वऱ्हाडात मुबलक पिकणारा कापूस मुंबईत आणि तेथून मँचेस्टरच्या सूतगिरण्यांना पुरविण्यासाठी या रेल्वे लाईनची इंग्रजांनी उभारणी केली हाेती. त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी ही लाईन उभारली तरी त्याचा स्थानिकांना सुद्धा चांगला फायदा झाला. राेजगाराची साधने वाढली हाेती. shakuntala railway अतिशय कमी तिकिटात खेड्यापाड्यातील नागरिकांचा सुखकर प्रवास हाेत असल्याने शकुंतला सर्वांची पहिली पसंती हाेती. विसाव्या शतकाच्या प्रारंभी वऱ्हाडात वाहतुकीची कुठलीही साधने नव्हती, त्या काळात येथील छाेट्या-माेठ्या गावांना बाहेरच्या जगाशी जाेडणारी शकुंतला रेल्वे ही एकमेव हाेती. ब्रिटिश काळात या रेल्वेचा प्रवास सहज झाला. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर काहीकाळ या रेल्वेचे वैभव अबाधित राहिले. पुढे प्रवासाची साधने वाढली आणि बदलत्या काळानुसार शकुंतलेच्या प्रगतीकडे दुर्लक्ष झाल्याने प्रवाशांनी सुद्धा पाठ फिरविली.
 
 
 
 
shakuntala railway
 
 
 
shakuntala railway थकतभागत 2017 पर्यंत ही रेल्वे धावली. पण, हा रेल्वे मार्ग ब्राॅडगेज व्हावा यासाठी तत्कालीन खासदार सुदामकाका देशमुख यांच्या काळापासूनच मागणी हाेत आहे. पुढे अमरावती व यवतमाळच्या प्रत्येक खासदाराने प्रयत्न केले. यश मात्र काेणालाच आले नाही. विद्यमान खासदारांचे पण प्रयत्न सुरूच आहेत. ‘जुने ते साेने’ असे नेहमी म्हटले जाते. त्यानुसार शकुंतलेची गरज आता प्रकर्षाने जाणवू लागली आहे. तेव्हा नॅराेगेज असलेली ही रेल्वे आता ब्राॅडगेज करून सुरू करावी, अशी मागणी या भागातल्या जनतेकडून सातत्याने हाेत आहे. या मागणीत तथ्य आहे. shakuntala railway तसे पाहिले तर यवतमाळ आता थाेडे पण, अचलपूर रेल्वेच्या नकाशावर कुठेही नाही. या दाेन्ही शहरांच्या विकासासाठी ते मारक ठरले आहे. हा मार्ग सुरू झाला तर वाहतुकीची एक चांगली सुविधा उपलब्ध हाेईल. राेजगार, उद्याेग धंद्यासह विकासाला चालना मिळेल. येत्या काही वर्षांत अचलपूर वेगळा जिल्हा हाेणार आहे. पुसद हा वेगळा जिल्हा हाेणार असल्याने यवतमाळचा भार कमी हाेणार आहे. विकासाची उंच भरारी घेण्यासाठी रेल्वे मार्ग दाेन्ही शहरांसाठी फारच उपयुक्त ठरणार आहे.
 
 
 
 
shakuntala railway हा भविष्याचा वेध घेऊनच यवतमाळात शकुंतला रेल्वे विकास समिती तर अचलपुरात शकुंतला रेल्वे बचाव समितीने ब्राॅडगेज मार्गासाठी लढा उभारला आहे. दाेन्ही समित्यांची कार्यपद्धती वेगळी आहे. यवतमाळच्या समितीने तांत्रिक माहिती गाेळा करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य लाेकप्रतिनिधी व रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदने देऊन पाठपुरावा सुरूच ठेवला आहे. त्यात समितीचे समन्वयक अक्षय पांडे यांचे याेगदान माेठे आहे. शकुंतला सुरू करण्याचा ध्यास या 27 वर्षीय युवकाने घेतला आहे. shakuntala railway केंद्र व राज्य स्तरावर हाेणाऱ्या प्रत्येक घडामाेडींवर त्याचे लक्ष असते. अचलपूरची समिती लाेकशाही मार्गाने वेगवेगळ्या आंदाेलनातून रेल्वे प्रशासन व लाेकप्रतिनिधींचे, मंत्र्यांचे लक्ष शकुंतलेकडे वेधत आहे. त्यांनी पण गडकरी व फडणवीसांची भेट घेतली. आतापर्यंत त्यांची 35 आंदाेलने झालीत. दाेन्ही लढ्यांचा सामूहिक परिणाम म्हणजे शकुंतलेच्या यवतमाळ - मूर्तिजापूर - अचलपूर या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षणाचे काम हाती घेतले गेले. शंकुतला रेल्वेचा मार्ग ब्राॅडगेज करण्याला फार खर्च येणार नाही.
 
 
 
shakuntala railway कारण, या मार्गासाठी एक-दाेन स्थानांवरचे अपवाद वगळता नव्याने भूसंपादन करण्याची गरज नाही. खर्च येणार आहे ताे नवीन रेल्वे लाईन व स्थानके उभारणीचा! राज्य शासनाने 2024 अर्थसंकल्पामध्ये सदर मार्गावर हाेणाऱ्या एकूण खर्चाच्या 50 टक्के निधी देण्याची तयारी दर्शविली आहे. यात फक्त किरकाेळ का हाेईना एक अडचण आहे. ती म्हणजे, सेंट्रल प्राॅव्हिन्सेस रेल्वे कंपनीची! या कंपनीच्या तावडीतून शकुंतला रेल्वेची सुटका झाली. पण, कंपनीने आपला दावा साेडलेला नाही. 2020 मध्ये ही कंपनी माेबदल्यासाठी न्यायालयात गेली हाेती. shakuntala railway लगेच त्यांनी ती याचिका मागे घेतली. सरकार या कपंनीचे समाधान करून तांत्रिक अडचण सहज दूर करू शकते. अंतिम टप्प्यात असलेला रेल्वे लाईनचा प्रकल्प अहवाल सादर हाेताच मान्यता मिळाली तर वेगाने या मार्गाचे काम सुरू हाेऊ शकते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मनावर घेतले तर रेल्वे मंत्र्यांना निर्णय घ्यायला काहीच वेळ लागणार नाही.
 
9420721225
Powered By Sangraha 9.0