उपोषणकर्त्या वैशाली पिंपळेंचे अजाज आयोगास निवेदन

27 Mar 2025 21:26:24
नागपूर, 
Vaishali Pimple : मुंबईच्या आझाद मैदानावर न्यायासाठी मागील 28 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या आदिवासी पारधी समाज भगिनी वैशाली पिंपळे (रा. गणेशनगर, ता. राहता, जि. अहल्यानगर) यांनी राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांना वरळी येथील अनुसूचित जाती- जमाती आयोगाच्या कार्यालयात निवेदन दिले.
 
 
nivedan
 
 
या निवेदनात पिंपळे यांनी राहुल पिंपळे व भरत काळे यांच्या खुनाचा तपास एसआयटी किंवा सीआयडी मार्फत करण्याची मागणी केली आहे. यावेळी आयोगाचे उपाध्यक्ष मेश्राम म्हणाले, हे निवेदन अहल्यानगरचे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी, सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी तत्काळ प्रभावाने कार्यवाही करावी व त्या माहितीचा तपशीलवार अहवाल पाठविण्यासंबंधी पत्र लिहून निर्देशित केले.
 
 
याबाबत आयोगाच्या कार्यालयात 7 एप्रिलरोजी तक्रारकर्ते महिला, पुरुष व उपरोल्लेखित अधिकाèयांच्या बैठकीचे आयोजनही करण्यात येईल व या आदिवासी परिवारासह न्याय मिळवून देण्यासाठी अनुसूचित जाती जमाती आयोग पुढाकार घेईल, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी आयोगाचे सदस्य सचिव संजय कमलाकर, वरिष्ठ संशोधन अधिकारी मीनाक्षी आडे, पोलिस निरीक्षक सोनम पाटील, विधि सहायक अ‍ॅड. राहूल झांबरे उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0