नैसर्गिक शेती पर्यावरणासाठी वरदान

29 Mar 2025 13:27:31
नागपूर,
Gaushala Netravan -निसर्ग विज्ञान गौशाळा नेत्रवन, डव्वा (खापरी)देशी गोवंश आधारित नैसर्गिक शेती प्रशिक्षण महाराष्ट्र गोसेवा आयोग पुणे व पशुसंवर्धन विभाग उमरेड यांचे संयुक्त विद्यमाने निसर्ग विज्ञान गोशाळा नेत्रवन, डव्वा (खापरी) तालुका,उमरेड जिल्हा नागपूर येथे सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत गोवंश आधारित नैसर्गिक शेती प्रशिक्षण व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन, महाराष्ट्र गोसेवा सदस्य पुणे.सनत कुमार गुप्ता तर निसर्ग विज्ञान मंडळ,अध्यक्ष,डॉ.विजय घुगे, प्रशिक्षण कार्यशाळा अध्यक्षपदी होतें. कार्यशाळा दरम्यान गोमाताचे संरक्षण आणि गोमातेचे शेण,गो मूत्र,वाया गेलेल्या चाऱ्याचे खत व्यवस्थापन, कृत्रिम रेतण, जनावरांना होणारे संसर्गजन्य रोग व उपाय आणि पशुपालन व वैरण शेतकऱ्यांच्या हितकरिता विस्तारीत मार्गदर्शन मिळाले. गोमाता आधारित शेती हे शेतकरी, समाज आणि पर्यावरणासाठी वरदान ठरले आहे..१००% नैसर्गिक आणि सेंद्रिय अन्न हे आपली रोगप्रतिकारक शक्ती आणि आरोग्य स्थिती वाढवण्यासाठी एक दृष्टिकोन आहे. हे जैविक उत्पादने लोकांना रोगमुक्त, दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगण्यास मदत करत आहेत.म्हणूनच देशी गाय आणि नैसर्गिक शेती एकमेकांशी जोडलेले असल्याने एक चांगले योगदान देत आहेत.
  
 
५ ४ ६
 
 
 प्रशिक्षणात उमरेड तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाच्या दवाखान्यातील पशू विकास अधिकारी,डॉ.घन बहादूर पशुधन विकास अधिकारी उमरेड डॉ. विद्याधर घनबहादूर ,डॉ.रविंद्र मांडेकर पशु सवर्धन विकास अधिकारी मकर्धोकडा यांच्या प्रमुख मार्गदर्शन सत्र, Gaushala Netravan कार्यक्रमाला निसर्ग विज्ञान मंडळाच्या नैसर्गिक व पर्यायी शेती प्रकल्पाच्या जामळापाणी ,खैरी, मुर्झडी,देवळी, डव्वा आणि खापरी गावातील पशुपालक शेतकरी उपस्थित होते.कार्यशाळां, व्यवस्थित पार पाडण्यास सहकार्यात निसर्ग विज्ञान मंडल चे रविंद्र पटले,सत्यपाल चौव्हाण,तगदिर मेश्राम आणि मिलन मेश्राम यांनी सहकार्य केले.
सौजन्य: डॉ.विजय घुगे,संपर्क मित्र 
Powered By Sangraha 9.0