नवी दिल्ली,
Gudi Padwa 2025 गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे. हा दिवस मराठी नववर्षाच्या सुरुवातीचा दिवस मानला जातो. गुढीपाडव्याच्या निमित्ताने घरासमोर गुढी उभारून तिची पूजा केली जाते आणि नैवेद्य अर्पण केला जातो. तसेच, या दिवसापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. महाराष्ट्रासह अन्य काही प्रदेशांमध्येही हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी नवीन कार्यांची सुरुवात शुभ मानली जाते. तसेच, प्रभू श्रीराम चौदा वर्षांचा वनवास संपवून माता सीतेसह अयोध्येत परतले, तो दिवसही चैत्र शुक्ल प्रतिपदेचा होता. तसेच, ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केल्याचे मानले जाते. म्हणूनच, या दिवशी हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची परंपरा आहे.
शालिवाहन शकाची सुरुवात
शालिवाहन राजाने शालिवाहन शकाची सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवशी केली. आख्यायिकेनुसार, शालिवाहन राजाने मातीचे सैन्य तयार करून त्यावर पाणी शिंपडून त्यात प्राण फुंकले आणि प्रभावी शत्रूंवर विजय मिळवला. त्याच्या या विजयाच्या प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते.Gudi Padwa 2025 महाभारतातील आदिपर्वात उल्लेख आहे की, उपरीचर नावाच्या राजाने इंद्राला नमन करण्यासाठी कळकाची काठी जमिनीत रोवली आणि तिची पूजा केली. हा दिवस नववर्षाचा पहिला दिवस होता, म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. तसेच, भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून शंखासुराचा वध केला, तो दिवसही चैत्र शुक्ल प्रतिपदेचा होता.गुढी हा फक्त ब्रह्मध्वज नाही, तर तो विजयध्वज देखील आहे. श्रीरामाने लंकेवर विजय मिळवून अयोध्येत परतल्यानंतर प्रजेने आनंदोत्सव साजरा केला. तसेच, प्रभू रामाने याच दिवशी वालीचा वध करून प्रजेची मुक्तता केली होती. त्यामुळे गुढी उभारणे हे विजयाचे प्रतीक मानले जाते.
गुढीपाडव्याचा आरोग्यदृष्ट्या महत्त्वाचा प्रसाद
गुढी Gudi Padwa 2025 उभारल्यानंतर आणि पूजा झाल्यानंतर कडुलिंबाची पाने आणि गूळ किंवा पुरण मिसळून प्रसाद म्हणून वाटला जातो. हे आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते, कारण यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. काही लोक यामध्ये धणे आणि चिंचही घालतात, ज्यामुळे त्याची चव वाढते.या दिवशी महाराष्ट्रात पारंपारिक पदार्थ बनवले जातात, जसे की पुरणपोळी, श्रीखंड-पुरी, साबुदाणा वडा, आंब्याचा रस आणि पुरी. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन या खास दिवसाचा आनंद घेतात.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वीज दर कपातीचा मोठा निर्णय
महाराष्ट्र राज्य सरकारने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. 1 एप्रिलपासून वीज दरात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पुढील पाच वर्षे स्वस्त दरात वीज मिळणार आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने नव्या दरांची घोषणा केली असून, यामुळे घरगुती वीज वापरकर्त्यांना मोठा दिलासा मिळेल.गुढीपाडवा हा सण केवळ नववर्षाची सुरुवात दर्शवत नाही, तर तो आपल्या संस्कृतीतील ऐतिहासिक, धार्मिक आणि सामाजिक महत्त्व अधोरेखित करणारा दिवस आहे. त्यामुळे हा दिवस आनंदाने साजरा करून नवीन वर्षाचे स्वागत करावे.