बडकस चौकात सामूहिक रामरक्षा पठण

    दिनांक :29-Mar-2025
Total Views |
नागपूर, 
Ram Raksha Pathan : हिंदू रक्षा समितीतर्फे सोमवारी 31 मार्चला सकाळी 7 वाजता महालमधील बडकस चौकात सामूहिक श्रीरामरक्षा पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
 
 

ngp 
 
 
 
श्रीराम नवरात्रात हजारो माता- भगिनींच्या उपस्थितीत होत असलेल्या आणि द्वितीय सरसंघचालक मा.स. गोळवलकर गुरुजी जन्मशताब्दी निमित्त 2006 साली प्रारंभ झालेल्या या अभिनव उपक्रमाचे यंदा हे अठरावे वर्ष आहे. महाल, इतवारी आणि गांधीबाग परिसरातील हजारो महिला या कार्यक्रमाची तयारी करीत आहेत. सोमवारी सकाळी 6.30 पासून, पताका घेऊन शोभायात्रेन हजारो माता-भगिनी बडकस चौकात एकत्र येतील.
 
 
आतापर्यंत या कार्यक्रमाला पंडितकाका धनागरे महाराज, राजदत्त, विवेक घळसासी, प्रमिलाताई मेढे, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, सद्गुरूदास महाराज, शांताक्का, सुहासिनी लाटकर, मा. गो. वैद्य, स्वामिनी ब्रह्मप्रकाशानंदा, माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, पश्मि क्षेत्र प्रचारक डॉ. रवींद्र जोशी, विश्वमांगल्य सभेच्या अ.भा. संघटन प्रमुख डॉ. वृषाली जोशी, प्रवचनकार रेणुका देशकर, डॉ. लीना गहाणे, निरुपणकार डॉ. कुमार शास्त्री, मनीषा संत, निवृत्त न्या. मीरा खडक्कार यांची उपस्थिती राहिली आहे.
 
 
यंदा या सोहोळ्यास स्त्री शक्तीच्या मीरा कडबे प्रमुख वक्त्या राहतील. मातृशक्तीद्वारे होत असलेल्या राष्ट्रजागरणाच्या या अभिनव सोहोळ्यात नागरिकांनी सहपरिवार सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदू रक्षा समितीचे संयोजक सुनील काबरा, श्रद्धा पाठक, प्रा. सुमेधा देशपांडे, माजी महापौर अर्चना डेहनकर, रश्मी फडणवीस, प्रभा जगनाडे, विद्या कान्हेरे, वृंदा रिसालदार, प्रतिभा दटके, मोहिनी खोत, शरयू चितळे, माधुरी मांजरे यांनी केले आहे.