गोंदिया,
Adani Power Plant जिल्ह्यातील तिरोडा येथील अदानी पाॅवर प्लांटमध्ये ट्रेनमधून कोळसा बाहेर काढताना एका कामगाराच्या डोक्याला जबर मार लागल्याने जखमी झालेला होताा.त्या जखमी कामगाराचा नागपूरच्या रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना २९ मार्च रोजी उघडकीस आली आहे.सदर मृत कामगाराचे नाव संजय यादव असे असून तो मध्यप्रदेश राज्यातील रहिवासी असल्याचे बोलले जात आहे.या संदर्भात अदानी पाॅवर प्लाँटप्रशासनाकडे संपर्क करुन माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता सहकार्य मिळाले नाही.तर दुसरीकडे कामगारांच्या मुद्याला घेऊन अदानी पाॅवर प्लांॅट समोर कामगारांनी काही दिवसापासून आंदोलन सुरु केले आहे.