नागपूर,
Gudipadwa 2025 : चैत्र शुक्ल प्रतिप्रदा, हिंदू नवीन वर्ष, प्रभु श्रीरामाच्या नवरात्राचा प्रारंभ आणि वसंत ऋतूचे आगमन, अशा सुंदर वातावरणात गुढी पाडवा हे नववर्ष, नवीन उत्साहात, जल्लोषात आलाप विद्यालयामध्ये मंगल एकूण 100 विद्यार्थ्यांच्या सहभागाने मराठमोळ्या पारंपरिक वेशभूषेत उत्साहात झाला.
गुढी पूजन, दीप प्रज्वलन, सूर्यश्लोकानंतर विद्यालयाचे अध्यक्ष श्याम निसळ, संचालिका अंजली निसळ, मनोज घुशेे, चैताली जीवतोडे आणि सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांनी ‘जयोस्तुते श्रीमहन्मंगले’ने कार्यक्रमास सुरुवात केली. तबला वादन, विविध सुंदर रचना सादर करण्यात आल्या. यात गगन सदन तेजोमय, स्वये श्रीराम प्रभू ऐकतची, हे राम हे राम, सेतू बांधारे, पायोजी मैने, विठू माऊली तू, जय हो जय हो शंकरा, जय जय महाराष्ट्र माझा, रामो राजमणी तसेच तबला वादनाचे विविध प्रकार आणि सुंदर गीते व नृत्य सादर झालीत. कनक व कस्तुरी निसळ यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.