तभा वृत्तसेवा वर्धा,
Wardha पहाटे थोड्या गारव्यात रसिकांची पावलं सोशॉलिस्ट चौकात वळत होते... चार पाच हजार प्रेक्षकांना दोन गायकांनी खिळवून ठेवत स्वराभिषेक केला तो आज गुढीपाडव्याच्या पहाटे!तब्बल एक तास उशिरा सुरू झालेल्या स्वरसाधनेत मंगेश बोरगावकर आणि श्रावणी वागळे या दोन गायकांनी प्राण ओतला! श्रीराम मंदिर व श्रीराम शोभायात्रा समितीच्या वतीने स्थानिक सोशॉलिस्ट चौकात आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे द्वारा संचालित सिद्धार्थ गुप्ता मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल, जय महाकाली शिक्षण संस्था अग्निहोत्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन प्रायोजित पाडवा पहाट कार्यक्रमाचा वर्धेकरांनी मनमुराद आनंद लुटला. जय जय रामकृष्ण हरीच्या गजराने कार्यक्रमाची सुरुवात झाली अन् स्वये श्री राम प्रभू ऐकती या गाण्याने सुर्योदय झाला.

शंखनाद, आतषबाजी, फुलांची उधळण करीत नववर्षाचे स्वागत केले. त्यानंतर उसंत न घेता मंगेशने अवघे गरजे पंढरपूर, कानडा राजा पंढरीचा, अबीर गुलाल उधळीत रंग, पावोजी मेने राम रतन धन पावो, मन उधान वार्याचे चित्रपटगीतासोबत दमा दम मस्त कलदंर हे गाणे सादर करताच मुड पालटत कशी मी जाऊ मथुरेच्या बाजरी ही लावणी नंतर लोकसंगीतकडे वाटचालकरीत रामाच्या बाणांचा हे गीत होत नाही तोच अनादी निर्गुण प्रगटली भवानी या जोगव्यानंतर शेवटच्या टप्प्यात अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केलेले गणपतीचे लंबोदर गजमुख मेरे मोरया हे कव्वाली स्टाईल गाणं हे अनिरुद्ध जोशी याने सादर केले आई भवानी तुझ्या कृपेने आणि शेवट मेरा रंग दे पसंती चोला हे या देशभक्ती गीताने समारोप झाला.निवेदन आसावरी देेशपांडे (गलांडे) यांनी केले. प्रास्ताविक विजय धाबे तर आभार राजू उमाटे यांनी मानले.कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ. पंकज भोयर खासदार अमर काळे, जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री, संत सयाजी महाराज, अरुण लेले, सुनील गफाट, डॉ. अभ्युदय मेघे, सचिन अग्निहोत्री, संजय लाभे, अरुण काशीकर उपस्थित होते.
पहिल्यांदा असे घडले...
पाडवा पहाटच्या पहिल्या कार्यक्रमापासुन उपस्थित राहणारे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे, दहा वर्षांपासुन सातत्याने उपस्थित राहणारे माजी खासदार रामदास तडस, संचालनात अनघा आगवन तर कार्यकर्त्यांमध्ये जगदीश चुरा अनुपस्थिती पहिल्यांदाच जाणवली.