गुढी पाडव्याला साधला खरेदीचा मुहूर्त

30 Mar 2025 19:48:44
तभा वृत्तसेवा वर्धा, 
gudi padwa 2025  गुढी पाडव्याच्या मुहूर्ताला हिंदू नववर्षाची सुरुवात करुन वर्धेकरांनी खरेदीचा मुहूर्त साधला. बाजारातील सराफा, इलेट्रॉनिस, ऑटोमोबाईल बाजारात कोटींची उलाढाल झाली.साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढी पाडव्यानिमित्त शहरातील बाजारपेठ सज्ज झाली होती. नववर्षाचा मुहूर्त साधत ग्राहकांनी विविध वस्तू खरेदीसाठी आधीच बुकिंग केली होती. ग्राहकांनी एलइडी, फ्रीज, वॉशिंग मशीन, एसी, मोबाईल, कॅमेरा, दुचाकी, चारचाकी वाहने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून आली.
 
 
gudi padwa 2025
 
गुढी पाडव्यानिमित्त सकाळपासून सर्वत्र चैतन्याचे वातावरण होते. सकाळी घरावर गुढी उभारण्यात आली. अनेक ठिकाणी धार्मिक आणि सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते. त्याचा फायदा रेडिमेड गारमेंट दुकानदारांना होत आहे. लग्नसराईचा हंगाम देखील समोर असल्याने रेडिमेड गारमेंट बाजार जोरात आहे. गुढी पाडव्याचा मुहूर्त साधत अनेकांनी नवीन घर खरेदी केले. ग्राहकांची सर्वाधिक गर्दी सराफा दुकानांत दिसून आली.
 
सोन्याला झळाळी
 
गुढी पाडव्याचा मुहूर्त साधत नागरिकांनी सोने खरेदीला पसंती दिली. सणानिमित्त अनेकांनी सोने, चांदी खरेदीसह गृहप्रवेशाचा बेत केला होता. सोन्याचा दर चढे असूनही मुहूर्तावर सराफा बाजारात ग्राहकांची गर्दी होती.
Powered By Sangraha 9.0