Maharani 4 ‘महाराणी' परतली आहे आणि सोनी लिव्हने नवा टीझरही प्रदर्शित केला आहे. 'महाराणी 4' मध्ये पुन्हा एकदा हुमा कुरेशी दिसणार आहे, जी नीडर राणी भारतीच्या भूमिकेत अधिक प्रखरतेने भर टाकणार आहे. निरक्षर गृहिणीपासून सत्तेला हादरवून टाकण्याचे धाडस दाखवणाऱ्या मुख्यमंत्र्यांपर्यंत सत्तेसाठी संघर्ष, विश्वासघात आणि राजकीय युद्ध नव्या उंचीवर पोहोचले आहे, जिथे हा सीझन अधिक लक्षवेधक आणि रोमांचक असेल.
हुमा कुरेशी लवकरच तिचा ओटीटी शो 'महारानी'4च्या चौथ्या सीझनसह परतणार आहे. सोमवारी निर्मात्यांनी आगामी सीझनचा पहिला टीझर रिलीज केला.Maharani 4 टीझरमध्ये तिचे पात्र अत्यंत प्रभावीपणे दाखवण्यात आले आहे. राजकारणाच्या या आक्रमक जगात बिहारचे रक्षण करण्यासाठी ती काहीही करण्यास तयार आहे. तिच्या दृढनिश्चयी नजरेने ती स्वतःशीच बोलत आहे, असे टीझरमध्ये दाखवण्यात आले. खास गोष्ट म्हणजे, हा टीझर हुमाच्या व्यक्तिरेखेवर आधारित आहे.