नागपूर,
Freedom fighter Savarkar स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचा ५ वा वर्धापन दिन आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पण दिन सप्ताह समारोपाचे औचित्य साधून नुकताच नागपूर शाखेतर्फे ''सागरा प्राण तळमळला" हा आगळावेगळा नाट्य अभिवाचनाचा उपक्रम नाशिक येथे पार पडला.स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे वीर सावरकरांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या भगूर आणि नाशिक येथे सहल काढण्यात आली. सहलीचा उद्देश सगळ्या सावरकर प्रेमींनी एकत्र येऊन सावरकरांच्या पवित्र वास्तूला भेट देऊन अभिवादन करणे हा होता. ह्यात भगूर वाडा,भगूर येथील प्राथमिक शाळा, सावरकर घराण्यातील अष्टभुजा देवीची मूर्ती असलेले खंडोबा मंदिर, आणि नाशिक येथील भव्य स्मारक येथे भेट देऊन अभिवादन करण्यात आले. ह्या सहलीत शेकडोच्या संख्येने सावरकर प्रेमी, संस्थेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले.
याच कार्यक्रमात नागपूर शाखेतर्फे, लेखिका, व्याख्यात्या आणि संस्थेच्या मार्गदर्शिका डॉ.शुभा साठे लिखित आणि प्रा. डॉ. अनिकेत मुनशी दिग्दर्शित,सागरा प्राण तळमळला ह्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावर आधारित दीर्घांकाचे अभिवाचन करण्यात आले. ह्यात वाचा भाषा प्रशिक्षक आणि समुपदेशक डॉ. अनुराधा मुनशी, प्रा. गौरव गोंधळेकर, मुंडले इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा वर्ग ९ वीचा विद्यार्थी,आल्हाद मुनशी स्वाती गोंधळेकर, डॉ शुभा साठे व डॉ. अनिकेत मुनशी ह्यांनी सहभाग घेतला. पार्श्वसंगीत निवृत्त अभियंता शशांक साठे ह्यांचे होते.Freedom fighter Savarkar संस्थेच्या नागपूर शाखेच्या कार्यकारी अध्यक्षा शिल्पा डोंगरे आणि कार्यकर्त्या वर्षा दुबे ह्यांचे ह्या उपक्रमाला सहकार्य लाभले. ह्या आगळ्या वेगळ्या प्रयोगाला उपस्थित सावरकर प्रेमी, कार्यकर्ते आणि पदाधिकारी ह्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी यांनी देखील नागपूर शाखेचे या उपक्रमा बद्दल भरभरून कौतुक आणि अभिनंदन केले.
सौजन्य:निकिता कायरकर ,संपर्क मित्र