भोपाळ,
9 व्याघ्रप्रकल्पांत 785 वाघ
Approval of Ministry of Climate Change मध्यप्रदेशात कान्हा, सातपुडा, बांधवगड, पेंच, संजय डुबरी, पन्ना, वीरांगना दुर्गावती आणि रतापाणी हे आठ व्याघ्रप्रकल्प आधीपासून आहेत. त्यात आता माधव व्याघ्रप्रकल्पाच्या रूपाने नवव्या व्याघ्रप्रकल्पाची भर पडली आहे. मध्यप्रदेशातील एकूण 9 व्याघ्रप्रकल्पांत 786 वाघ असून ही देशातील सर्वाधिक संख्या आहे.
वन्यजीवप्रेमींसाठी अभिमानाची बाब : मोदी
केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी माधव राष्ट्रीय उद्यानाला देशातील 58 व्या व्याघ्र प्रकल्प स्थान मिळाल्याची माहिती ‘एक्स’वर पोस्ट करून दिली होती. त्यांच्या पोस्टला टॅग करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, वन्यजीवप्रेमींसाठी ही अभिमानाची बाब आहे. Approval of Ministry of Climate Change माधव व्याघ्र राष्ट्रीय उद्यानाचा देशाच्या 58 व्या व्याघ्रप्रकल्पात समावेश होणे ही मध्यप्रदेश आणि वन्यजीवप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. भारताला वन्यजीव विविधता आणि वन्यजीवांचा उत्सव साजरा करणारी संस्कृती लाभली आहे. प्राण्यांचे संरक्षण करण्यात आणि शाश्वत विकासासाठी योगदान देण्यात आपण नेहमीच अग्रेसर राहू.
मध्यप्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यातील माधव राष्ट्रीय उद्यानाला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला आहे. राज्यातील हा नववा, तर देशातील 58 व्याघ्र प्रकल्प आहे. Approval of Ministry of Climate Change केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने मान्यता दिल्यानंतर मध्यप्रदेश सरकारने यासंदर्भात शनिवारी अधिसूचना प्रसिद्ध केली. गेल्या तीन महिन्यात सलग दुसरा व्याघ्रप्रकल्प या राज्याला मिळाला आहे.
1956 मध्ये माधव राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झाली होती. दोन वर्षांपूर्वी माधव राष्ट्रीय उद्यानात दोन मादी आणि एक नर वाघ सोडण्यात आला होता. मादी वाघिणीने दोन बछड्यांना जन्म दिला. वाघासोबतच, बिबट्या, लांडगा, कोल्हा, साळू, अजगर, चिंकारा आदी वन्यप्राणीही माधव राष्ट्रीय उद्यानात आहे. Approval of Ministry of Climate Change यासंदर्भात ‘एक्स’वरील पोस्टमध्ये मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव म्हणाले, सलग तिसऱ्या महिन्यांत राज्यातील दुसऱ्या व्याघ्र प्रकल्पाला मान्यता मिळणे ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे. यापूर्वी डिसेंबर 2024 मध्ये रतापाणी व्याघ्र प्रकल्पाला मान्यता मिळाली होती. सर्व वन्यजीवप्रेमी आणि संवर्धनकर्त्यांचे मी अभिनंदन करतो. हा विकास आमच्या वनाअधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नांचे फळ आहे.