अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून केले लग्न

01 Apr 2025 21:37:49
तभा वृत्तसेवा
मारेगाव, 
Moregao News : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन लग्न केल्याची घटना तालुक्यातील मारेगाव शहरात घडली. मुलगी अल्पवयीन असल्यामुळे मुलीच्या भावाच्या तक्रारीवरून मारेगाव पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला.
 
 
JKK
 
शनिवार, 29 मार्चला सकाळी उठल्यावर बहीण घरी दिसली नाही म्हणून भावाने तिची घरी तसेच सभोवताल सगळीकडे शोधाशोध केली, पण ती कुठेही दिसून आली नाही. तसेच नातेवाईकांना फोन करून विचारले असता ती कुठेच नव्हती. बहीण न आढळल्याने भावाने मावशीच्या मुलाला फोन केला असता मावसभावाने सांगितले की, ती माझ्याकडे नाही परंतु तिच्या लग्नाचे फोटो मात्र माझ्या मोबाईलवर कोणीतरी पाठवलेले आहेत.
 
 
मुलीचे फोटो बघताच मुलीच्या भावाच्या लक्षात आले की, हा आपला चुलत मेहुणा कृष्णा हनुमंतू कोशट्टीवार (वय अंदाजे 22, मांडवी, ता. किनवट, जि. नांदेड) हा असून यानेच आपल्या बहिणीला फूस लावून पळवून नेले आहे. बहिण अल्पवयीन म्हणजे 17 वर्षे 6 महिन्यांची असल्यामुळे तिला पळवून नेणाèया कृष्णा कोशट्टीवारच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार भावाने मारेगाव पोलिस ठाण्यात केलेली आहे.
Powered By Sangraha 9.0