महाराष्ट्र दिनाचा निषेध करीत काळ्या फिती लावणार

10 Apr 2025 21:39:13
नागपूर,
Wamanrao Chatap : स्वतंत्र विदर्भ राज्य मिळविण्यासाठी १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचा करणार असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. वामनराव चटप यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
 

CHATAP 
 
 
 
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकार्‍यांची बैठक श्रीनिवास खांदेवाले यांच्या अध्यक्षतेखाली केदार भवन, गिरीपेठ येथे झाली. महाराष्ट्र दिनी जिल्ह्याजिल्ह्यात धरणे आंदोलन केले जाणार असून, महाराष्ट्र दिनाचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून आंदोलन केले जाणार आहे. राज्य आत्महत्या रोखू शकत नाही म्हणून विदर्भाचे स्वतंत्र राज्य व्हायला हवेत. शेतकरी व इतर शोषित, उपेक्षीत घटकांच्या पाठीशी विदर्भ राज्य आंदोलन समिती उभी राहणार आहे.
 
 
तसेच पश्चिम विदर्भाचा मेळावा २५ मे रोजी दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आला आहे. यात शेतकरी आत्महत्या, विदर्भाचा अनुशेष, सोशिओइकॉनॉमिक प्रश्न असणारा नक्षलवाद, प्रदूषण, कुपोषणामुळे बालमृत्यू आदींवर चर्चा होईल. विदर्भाचे स्वतंत्र राज्य व्हावे,यासाठी आंदोलनाची तयारी ठेवली आहे. यावेळी श्रीनिवास खांदेवाले, रंजना मामर्डे, मुकेश मासुरकर, अरुण केदार, पी. आर. राजपूत, सुनील चोखारे, प्रशांत नखाते, गुलाबराव धांडे आदींची उपस्थिती होती.
Powered By Sangraha 9.0