प्रहारचे मशाल आंदाेलन आमदारांच्या निवासस्थानी

12 Apr 2025 19:21:42
तभा वृत्तसेवा हदगाव,
Prahar Jan Shakti Party हदगाव तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने, तालुका अध्यक्ष अनिल कदम यांच्या नेतृत्वात, शेतकऱ्याच्या मागण्यांसाठी शुक्रवार, 11 एप्रिल राेजी मध्यरात्री 12 वाजता आमदार बाबुराव काेहळीकर यांच्या निवासस्थानी मशाल (टेंभा) आंदाेलन छेडण्यात आले.प्रहार जनशक्तीचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या निर्देशांनुसार, राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात एकाच वेळी या मशाल माेर्च्याचे आयाेजन करण्यात आले. यामध्ये कार्यकर्ते गळ्यात निळा दुपट्टा, हातात भगवा झेंडा आणि मशाल घेऊन आमदारांच्या घरासमाेर धडकले.
 

Prahar Jan Shakti Party  
प्रहारच्या या मशाल आंदाेलनामागील प्रमुख मागण्या, शेतकऱ्याना तातडीने कर्जमाी मिळावी, शेतमालाला याेग्य व हमीभाव मिळावा, शेतकरी केंद्रबिंदू मानून धाेरणे राबवावी, शेतकèयांवरील अन्यायकारक धाेरणे त्वरित रद्द करावी, या हाेत्या.आंदाेलनापूर्वी संबंधित विभागाला अधिकृत निवेदनाद्वारे माहिती देण्यात आली हाेती. आंदाेलन शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. या आंदाेलनात प्रहार पक्षाचे सर्व पदाधिकारी, शेतकरी बांधव व कार्यकर्ते माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते.
Powered By Sangraha 9.0