इस्लामाबाद,
The population of Hindu minorities in Pakistan पाकिस्तानमध्ये हिंदूंची लोकसंख्या २०१७ मध्ये ३.५ दशलक्ष होती, ती २०२३ मध्ये वाढून ३.८ दशलक्ष इतकी झाली आहे. त्यामुळे हिंदू हा पाकिस्तानमधील सर्वात मोठा धार्मिक अल्पसंख्यांक समुदाय ठरला आहे. पाकिस्तान सांख्यिकी ब्युरोने PBS गुरुवारी, १० एप्रिल २०२५ रोजी, ७ व्या लोकसंख्या आणि गृहनिर्माण जनगणनेचे निकाल जाहीर केले.
डॉन न्यूजच्या अहवालानुसार, २०२३ मध्ये पाकिस्तानची Pakistan एकूण लोकसंख्या २४०.४५८ दशलक्ष (२४१.४९ मिलियन) होती. त्यामध्ये मुस्लिमांची टक्केवारी २०१७ मधील ९६.४७ टक्क्यांवरून थोडी घसरून ९६.३५ टक्क्यांवर आली आहे. मात्र, बहुतेक धार्मिक अल्पसंख्यांक समुदायांच्या लोकसंख्येत वाढ झाल्याचे आढळले आहे.हिंदूंची लोकसंख्या ३.८ दशलक्षवर पोहोचली असली तरी, एकूण लोकसंख्येतील त्यांचा वाटा २०१७ मधील १.७३ टक्क्यांवरून २०२३ मध्ये १.६१ टक्क्यांवर घसरला आहे. याचा अर्थ असा की इतर अल्पसंख्याक समुदायांच्या लोकसंख्येत तुलनेत अधिक गतीने वाढ झाली आहे.
ख्रिश्चन समुदायाची लोकसंख्याही २.६ दशलक्ष वरून वाढून ३.३ दशलक्ष झाली असून, त्यांचा टक्का १.२७ वरून १.३७ टक्क्यांपर्यंत वाढलेला आहे.दरम्यान, अहमदिया मुस्लिम समुदायाची लोकसंख्या मात्र घटली आहे. २०१७ मध्ये १,९१,७३७ असलेल्या या समुदायाची लोकसंख्या २९,०५३ ने घटून २०२३ मध्ये १,६२,६८४ झाली असून, त्यांचा टक्का ०.०९ वरून ०.०७ टक्क्यांवर आला आहे.शिखांची लोकसंख्या १५,९९८ तर पारशी समुदायाची लोकसंख्या २,३४८ असल्याचे नोंदवले गेले आहे.सदर जनगणनेनुसार, २०१७ मध्ये पाकिस्तानची लोकसंख्या २०७.६८ दशलक्ष होती. २०२३ मध्ये ती २४१.४९ दशलक्ष झाली असून, ही २.५५ टक्क्यांची वाढ आहे. हेच प्रमाण कायम राहिल्यास २०५० पर्यंत पाकिस्तानची लोकसंख्या दुप्पट होण्याचा अंदाज आहे.लिंग गुणोत्तरानुसार, पुरुषांची संख्या १२४.३२ दशलक्ष तर महिलांची संख्या ११७.१५ दशलक्ष आहे. ट्रान्सजेंडर व्यक्तींची संख्या २०,३३१ इतकी नोंदवण्यात आली आहे.