पालकमंत्री डॉ. भोयर आजपासुन दोन दिवस जिल्ह्यात

    दिनांक :12-Apr-2025
Total Views |
वर्धा,
Pankaj Bhoyar : जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर १३ रोजी वर्धा जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. सकाळी १०.४० वाजता प्रशासकीय भवन आर्वी येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत विविध लोकार्पण व ई-भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी ३ वाजता येळाकेळी येथील पंचमुखी हनुमान मंदिर येथे कार्यक्रमास उपस्थित राहतील.
 
 
 
bhoyar
 
 
 
सायंकाळी ४.३० ते ५.३० वाजता वर्धा येथे प्रशासकीय कामाकरीता राखीव. ६ वाजता हिंगणी येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन, रात्री ८ वाजता मारोती देवस्थान वरुड रेल्वे येथे महाप्रसाद कार्यक्रमास उपस्थिती. ९ वाजता राम दरबार चौक वर्धा येथे महाप्रसाद कार्यक्रमास उपस्थित राहतील. १४ रोजी सकाळी ९ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक वर्धा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करतील.
 
 
९.१५ वाजता दुर्गा टॉकीज जवळील जैन मंदिर येथे गाळमुत धरण गाळयुक्त शिवार मोहीम राबविण्याकरिता जलरथ शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. ९.३० वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथे सिंथेटीक धाव पथ व पॉलमर ग्रास फुटबॉल मैदानाच्या भूमिपूजन, १० वाजता हिंदू स्मशानभूमी येथील शेड बांधकाम व सौंदर्यीकरण कामाचे भूमिपूजन, पोष्ट ऑॅफीस ते स्मशानभूमी रस्ता बांधकामाचे भूमिपूजन, कब्रस्थान ते स्मशानभूमी पर्यंतच्या रस्त्याचे लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती.
 
 
१०.३० वाजता सुदामपूरी येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन, ११ वाजता बेद ले आऊट येथील बगीच्या बांधकाम व सौंदर्यीकरणाच्या कामाचे लोकार्पण, ११.३० वाजता वर्धा नप सभागृहात नगरपरिषद अंतर्गत सर्व कामांचे ई भूमिपूजन व ई लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी १ वाजता देवळी येथे बसस्थानकाचे लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. १.३० वाजता पडेगाव येथील विविध विकास कामाचे लोकार्पण, दुपारी ३ ते ४.५० वाजता प्रशासकीय कामासाठी राखीव. सायंकाळी ५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी ७ वाजता कॉस्ट्राईब कल्याण महासंघ कार्यालय इतवारा चौक येथे कार्यक्रमास उपस्थित राहतील.