शेतकऱ्यांसाठी ऊर्जा सवलत: २०२६ पर्यंत १२ तास मोफत वीज

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन

    दिनांक :13-Apr-2025
Total Views |
वर्धा,
Chief Minister Devendra Fadnavis “डिसेंबर २०२६ अखेर राज्यातील ८० टक्के शेतकऱ्यांना वर्षभर दररोज १२ तास मोफत वीज पुरवठा केला जाणार आहे,” अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आर्वी येथे केली. येत्या पाच वर्षांत सामान्य नागरिकांचे वीज बिलही वर्षानुवर्षे कमी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आर्वी येथे ७२० कोटींच्या ११ विकास कामांचे ई-लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले. यामध्ये नवीन प्रशासकीय इमारतीसह उपजिल्हा रुग्णालय, स्विमिंग पूल, अंतर्गत रस्ते, तलाव संवर्धन, सौरऊर्जा प्रकल्प अशा विविध कामांचा समावेश आहे.
 
 
 
Chief Minister Devendra Fadnavis
 
 
सिंचन प्रकल्प, वीज निर्मिती आणि रोजगाराला चालना
वर्धा जिल्ह्यातील अप्पर वर्धा आणि वाढवण-पिंपळखुटा सिंचन प्रकल्पांद्वारे शेतीसाठी पाणी आणि वीज उपलब्ध होणार आहे. अप्पर वर्धा प्रकल्पावरून ५०० मेगावॅट वीज निर्माण होणार आहे. या भागातील शेतीला याचा मोठा लाभ होईल. समृद्धी महामार्गावरील विरुळ नोडवर एमआयडीसीची उभारणी करण्यात येणार असून स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील.राज्यातील ३०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांना सौरऊर्जेच्या माध्यमातून मोफत वीज देण्यात येणार आहे. २०२५ ते २०३० या कालावधीत वीजदर कमी करण्याची प्रक्रिया राज्य शासनाने हाती घेतली आहे.
 
 
वर्ध्याला लॉजिस्टिक केंद्राचा दर्जा
 
वर्ध्यातून सुरु होणाऱ्या शक्तीपीठ महामार्ग आणि सिंदी ड्रायपोर्टमुळे वर्धा जिल्हा मध्य भारताचे लॉजिस्टिक केंद्र म्हणून विकसित होत आहे. Gadchiroli, Chandrapur, Nagpur, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये लोहखनिजाधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने विशेष सवलती जाहीर केल्या आहेत.६२ टीएमसी पाण्याच्या सांडव्याद्वारे ५५० किमी लांबीची नवीन नदी निर्माण करणाऱ्या वैनगंगा-नळगंगा प्रकल्पासाठी १ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे वर्ध्यासह विदर्भातील १० जिल्ह्यांतील दुष्काळी भाग सिंचनाखाली येणार आहे.
 
विकास कामांमुळे वर्धा जिल्ह्यासाठी ऐतिहासिक क्षण
 
या लोकार्पण सोहळ्यात पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी वर्धा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या या कामांमुळे जिल्ह्यासाठी आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचे नमूद केले. शिक्षण क्षेत्रात आदर्श शाळा उपक्रम राबवण्यात येणार असून १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी पहिल्या टप्प्यातील शाळांचा शुभारंभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाला खासदार अमर काळे, आमदार दादाराव केचे, सुमित वानखेडे, समीर कुणावर, राजेश बकाने, माजी खासदार रामदास तडस, जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट आदी उपस्थित होते.