मेरठ,
muskan is pregnant उत्तर प्रदेशातील गाजलेल्या सौरभ राजपूत हत्याकांड प्रकरणात आरोपी असलेली Muskan Rastogi मुस्कान रस्तोगी ही सध्या गरोदर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रकरणाला नवे आणि अधिक संवेदनशील वळण मिळाले आहे. तुरुंगात असताना तिची तब्येत अचानक खालावल्याने करण्यात आलेल्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये ती गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. यानंतर तुरुंग प्रशासनाने तिला गर्भवती महिलांसाठी राखीव असलेल्या विशेष बॅरेकमध्ये हलवले आहे.Saurabh Rajput murder case
तिच्या काळजीसाठी तज्ञ डॉक्टरांची टीम नियुक्त करण्यात आली असून, लोह व कॅल्शियमसह पौष्टिक आहाराचा विशेष डाएट प्लॅन तयार करण्यात आला आहे. वरिष्ठ तुरुंग अधीक्षक डॉ. विरेशे राज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्कानला कोणतेही काम करावे लागणार नाही. ती नियमितपणे स्त्रीरोगतज्ज्ञांच्या देखरेखीखाली राहणार आहे.
हत्येनंतर फिरायला गेली शिमलाला
३ मार्च रोजी मुस्कानने आपल्या प्रियकर Sahil Shukla साहिल शुक्लाच्या मदतीने आपल्या पती सौरभची निर्घृण हत्या केली होती. मृतदेह सिमेंटने भरलेल्या प्लास्टिक ड्रममध्ये लपवून दुसऱ्याच दिवशी हे दोघे शिमलाच्या सहलीवर गेले. १७ मार्च रोजी परत आल्यावर मुस्कानने ही घटना तिच्या पालकांसमोर उघड केली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत १८ मार्च रोजी साहिलला अटक केली.पोलिसांनी मुस्कान व साहिलला ब्रह्मपुरीतील गुन्ह्याच्या स्थळी नेले असता, तिथे सिमेंटने भरलेला प्लास्टिकचा ड्रम सापडला ज्यात सौरभचा मृतदेह होता. १९ मार्च रोजी न्यायालयात हजर करून दोघांना तुरुंगात पाठवण्यात आले.
ड्रग्स व्यसनामुळे आरोग्य बिघडले
मुस्कान व साहिल दोघेही अंमली पदार्थांचे व्यसनी होते. त्यामुळे तुरुंगात दाखल झाल्यानंतर त्यांना व्यसनमुक्ती केंद्राच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले. साहिलची स्थिती सुधारल्याची नोंद झाली, मात्र मुस्कानची तब्येत खालावली. ५ एप्रिल रोजी प्रशासनाने महिला डॉक्टरसाठी सीएमओला पत्र दिले. अखेर १७ एप्रिल रोजी स्त्रीरोगतज्ज्ञांनी तपासल्यानंतर तिचे गरोदरपण निश्चित झाले.
रामायण ऐकते, पण कोणाशी बोलत नाही
तुरुंगातील विशेष बॅरेकमध्ये हलवल्यानंतर मुस्कान आता सकाळी व संध्याकाळी रामायण ऐकते आणि दुपारी टीव्ही पाहते, अशी माहिती तुरुंग अधिकाऱ्यांनी दिली. ती बॅरेकमधील इतर कोणत्याही महिला कैद्यांशी संवाद साधत नाही. तिच्या आरोग्याची आणि बाळाची विशेष काळजी घेतली जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.