उन्हाळ्यात कोणते कपडे घालावेत?

जाणून घ्या आरोग्यासाठी आणि आरामासाठी उपयुक्त कपड्यांचे पर्याय

    दिनांक :14-Apr-2025
Total Views |
मुंबई,
summer सध्या तापमानात मोठी वाढ झाल्याने उन्हाळ्याची तीव्रता अधिक जाणवू लागली आहे. या उष्णतेपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी योग्य कपड्यांची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चुकीचे कपडे घातल्यास उष्णता वाढून घाम, चिडचिड, त्वचेचे त्रास तसेच उष्माघाताचा धोका वाढतो. त्यामुळे उन्हाळ्यात कोणते कपडे घालावेत, हे जाणून घेणे आवश्यक आहे.
 

What clothes to wear in summer 
 
 
सुटसुटीत आणि हलक्या रंगाचे कपडे निवडा
 
उन्हाळ्यात काळे, निळे किंवा गडद रंग टाळावेत कारण हे रंग उष्णता शोषून घेतात. त्याऐवजी पांढरे, फिकट निळे, पिवळे, बेबी पिंक किंवा इतर हलके रंग उष्णतेपासून बचाव करतात. अशा रंगांचे कपडे अंगावर थंडावा देतात आणि आरामदायकही असतात.
 
सुताची वस्त्रे सर्वात उत्तम
 
कॉटन अर्थात सूती कपडे हा उन्हाळ्यातील सर्वोत्तम पर्याय मानला जातो. हा प्रकार घाम सहजपणे शोषून घेतो आणि त्वचेला श्वास घेण्यास मदत करतो. लिनेन कपडेही यासाठी चांगले पर्याय आहेत.
 
 
सुटसुटीत फॅब्रिक असलेले कपडे निवडा
 
अतिशय घट्ट किंवा शरीराला चिकटून राहणारे कपडे उन्हाळ्यात घालणे टाळावे. त्याऐवजी थोडे सैलसर, हलक्या फॅब्रिकचे कपडे घालावेत. यामुळे त्वचेच्या त्रासापासून बचाव होतो आणि शरीर थंड राहते.
 
टोपी, सनग्लासेस आणि स्कार्फ वापरा
 
सूर्याच्या तीव्र प्रकाशापासून चेहरा आणि डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी टोपी, सनग्लासेस आणि स्कार्फ वापरणे आवश्यक आहे. यामुळे उन्हाळ्यातील थकवा आणि डोळ्यांवरील ताण कमी होतो.
 
फुटवेअरही महत्त्वाचे
 
गर्भदोष टाळण्यासाठी चप्पल, सँडल्स किंवा इतर ओपन फुटवेअरचा वापर करावा. बंद बूट घालणे टाळावे कारण त्याने उष्णता अडकते आणि घाम येण्याची शक्यता वाढते.उन्हाळ्यात योग्य कपड्यांची निवड केल्यास केवळ आरामदायक वाटते असे नाही, तर त्यामुळे आरोग्याचे संरक्षणही होते. त्यामुळे फॅशनसोबतच हवामानानुसार कपड्यांची निवड करणे सर्वात महत्त्वाचे आहे.