आरोग्य क्षेत्रात होमिओपॅथीची अहम भूमिका

15 Apr 2025 12:34:38
नागपूर,
Dr. Vilas Dangre काही वर्षांपूर्वी भारतात होमिओपॅथी ही औषधोपचारासाठी खुपच कमी परिचित होती. परंतु काळाच्या ओघात, होमिओपॅथीने आरोग्यसेवेत महत्त्वाची भूमिका बजावण्यास सुरुवात केली आहे. या वाढीचे श्रेेय गेल्या काही वर्षांपासून या देशात ती स्थापित करण्यासाठी अविश्रांत परिश्रम करणाèया डॉक्टरांना दिले पाहिजे, असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. विलास डांगरे यांनी केले.
होमिओपॅथिक मेडिकल असोसिएशन ऑफ इंडियाद्वारे (एचएमएआय) द्वारे धंतोलीमधील देवी अहल्या मंदिरात होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनेमन यांची 270वी जयंती साजरी करण्यात आली.
 

डांगरे  
 
नागपूर होमिओपॅथीचे निवृत्त प्राचार्य डॉ. अरविंद कोठे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला
मेळघाटातील बैरागड येथील सामाजिक कार्यकर्ते पदमश्री रवींद्र कोल्हे व पद््मश्री स्मिता कोल्हे, पद्मश्री डॉ. विलास डांगरे प्रमुख पाहुणे होते. नुकतीच पद्मश्री जाहीर झाल्याबद्दल डॉ. विलास डांगरे यांचा सत्कार करण्यात आला. या क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल प्रतिष्ठित ज्येष्ठ होमिओपॅथिक डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला.Dr. Vilas Dangre त्यात डॉ. ज्ञानेश ढाकुलकर व डॉ. प्रकाश ढोबळे, डॉ. नीलिमा बन्नोरे (नागपूर), डॉ. अनिल लोणारे (वर्धा), डॉ. नरेंद्र शास्त्रकार (चंद्रपूर), (नागपूर) आदींचा समावेश होता.
Powered By Sangraha 9.0