लवकुश नगर येथे हनुमान जयंती साजरी

15 Apr 2025 16:16:27
नागपूर,
Lavkush Nagar Nagpur प्रभाग ३४  मधील लवकुश नगर येथे हनुमान मंदिरात हनुमान जयंती साजरी करण्यात आली . दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा येथे महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला..सकाळी ज्येष्ठ नागरिकांतर्फे भजनाचा कार्यक्रमकरण्यात आला होता. महाप्रसादाच्या वेळी अनेक युवा वर्गांनी, महिला ,पुरुषांनी येथे सेवा दिली..सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यामध्ये कृष्णा सोनटक्के, सावरकर, अशोक राऊत, विजय गावंडे, जोशना इंगळे,आस्था आमटे,राजेश बननगरे,राजेश भोयर यांनी अथक प्रयत्न केले..
 
 
 
sudha
 
 
 
सौजन्य:ज्योत्स्ना इंगळे,संपर्क मित्र
 
 
 
Powered By Sangraha 9.0