Black Rose सर्वसामान्यपणे गुलाब म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो लाल, पांढरा, पिवळा किंवा गुलाबी रंग. मात्र काळा गुलाब हा अनेकांचा कुतूहलाचा विषय ठरतो. पूर्वी काळ्या गुलाबाची फुलं ही केवळ चित्रात किंवा कथांमध्ये पाहायला मिळायची. पण आता काळा गुलाब प्रत्यक्षात घरीही लावता येतो, आणि त्यासाठी फारशी अडचणही येत नाही.
काय आहे काळा गुलाब?
काळा Black Rose गुलाब हा तुर्कीमधील हाफेटी प्रांतात सर्वप्रथम पाहायला मिळाला. तो पूर्णपणे काळा नसून गडद जांभळसर रंगाचा असतो, पण दिसायला पूर्ण काळा भासतो. आधुनिक बागायतीत काही जाती विशेष प्रक्रिया करून काळ्या गुलाबासारखा रंग प्राप्त करतात.
घरी काळा गुलाब लावण्यासाठी काय करावे?
काळ्या गुलाबाची कलमे किंवा बियाणे ऑनलाइन किंवा काही खास नर्सरीमधून मिळू शकतात.
ही झाडं थोड्या थंड हवामानात चांगली वाढतात. त्यामुळे उन्हापासून थोडं सावली असलेलं ठिकाण निवडणं योग्य.
कुंडीत किंवा बागेत लावताना चांगल्या प्रतीची खत मिसळलेली मातीत लागवड करावी.
नियमित पाणी देणं आवश्यक असून पाण्याचा निचरा योग्य प्रकारे व्हावा याची काळजी घ्यावी.
सजावटीसाठी उत्तम पर्याय
काळ्या गुलाबाचं फुल एक वेगळाच रुबाब दाखवतं. घरच्या बागेत हे फूल फुललं की पाहणाऱ्यांचं लक्ष वेधून घेतं. त्यामुळे सजावटीसाठी, फोटोशूटसाठी किंवा अनोख्या भेटवस्तू म्हणून काळ्या गुलाबाला मागणी वाढते आहे.
शेतीसाठी संधी
काळ्या गुलाबाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं तर त्याचा व्यापारी उपयोगही होऊ शकतो. खास करून सजावटी फुलांच्या बाजारात काळ्या गुलाबाला चांगला दर मिळतो.