बडनेरा ते नाशिक मेमू ट्रेनच्या वेळेत बदल

प्रवाशांनी मानले नवनीत राणांचे आभार

    दिनांक :17-Apr-2025
Total Views |
अमरावती, 
Badnera to Nashik MEMU train : बडनेरा व नाशिक रोड मेमू ट्रेनची वेळ बदलून ती प्रवाशांच्या सोयीची करण्यात आल्याने प्रवाशांनी माजी खासदार नवनीत राणा यांचे आभार मानले आहेत. कारण, याकरिता नवनीत राणा यांनीच प्रयत्न केले होते.
 
 
rana
 
आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात अमरावती जिल्ह्यातील अनेक प्रकल्प पूर्णत्वास नेणार्‍या नवनीत राणा यांनी अमरावती रेल्वे स्टेशन तसेच बडनेरा रेल्वे स्टेशनवरून जाणार्‍या अनेक गाड्यांचा थांबा बडनेरा व अमरावती येथे दिला. त्याचप्रमाणे नवीन गाड्या सुद्धा अमरावती व बडनेरा रेल्वे स्टेशनवरून नवनीत राणा यांच्या प्रयत्नाने सुरू झाल्या. यातीलच एक बडनेरा ते नाशिक रोड मेमू गाडी बडनेरा येथून सकाळी ११ वाजून ५ मिनिटाला निघायची. त्यामुळे शेगावकडे जाणार्‍या अनेक भाविक भक्तांना शेगाव पोहचायला उशहर होत होता. शेगाववरून यायला रात्रीचा उशीर सुद्धा होत होता. तसेच बडनेरा ते नाशिकपर्यंत नियमित प्रवासी असून विशेषत: नोकरदार वर्ग, विद्यार्थी व विशेषत: महिला वर्ग या हजारोच्या संख्येने प्रवास करीत असतात.
 
 
त्यामुळे गाडीची वेळ १ तास आधी सुरू करावी याकरिता सर्व प्रवासी मंच व नागरिकांनी माजी खा. नवनीत राणा यांच्याकडे निवेदन देत मागणी केली होती. त्यामुळे सर्व प्रवाशांना होणारा त्रास बघता नवनीत राणा यांनी रेल्वे प्रशासनाकडे अथक प्रयत्न करून पाठपुरावा केला. त्यामुळे बडनेरावरून ११ वाजून ५ मिनिटांनी निघणारी बडनेरा ते नाशिक मेमू ट्रेन आता सकाळी १० वाजून ५ मिनिटांनी निघणार असल्याचे परिपत्रक रेल्वे प्रशासनाद्वारे काढले व ही गाडी सकाळी १० वाजून ५ मिनिटांनी सुरू करण्यात आली. त्यामुळे प्रवाशी, नागरिक, विद्यार्थी व विशेषत: महिलांनी नवनीत राणा यांचा जाहीर सत्कार करून आभार व्यक्त केले. यावेळी राज्यसभेचे खासदार डॉ. अनिल बोंडे, तसेच प्रवासी मंचचे पदाधिकारी सुभाष बाळे, डॉ. शैलेश जयस्वाल, डॉ. दिलीप सूर्यवंशी, बलगोविंद राठी, प्रा. चंद्रशेखर शेळके, डॉ. वनिता भोपत, डॉ. रोहित अग्रवाल, प्रा. आनंद पांडे, महेंद्र पिटे आदी उपस्थित होते.