नागपूर,
Dighori Nagpur राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक मंडळ, दिघोरी नागपूरच्या विद्यमाने मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात राजेन्द्र नांदुरकर यांच्या सुमधुर गीता ने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फेस्काॅम पूर्व विदर्भ प्रादेशिक विभागाचे सचिव डॉ. दीपक शेंडेकर होते. अतिथी म्हणून भारत निर्माण आंदोलनचे संयोजक डॉ. गौतम मोरे, एवं हेमंत भांडे उपस्थित होते.
ज़्येष्ठ नागरिक दीपक नक्षणे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला होता. Dighori Nagpur डॉ. दीपक शेंडेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून दीपक नक्षणे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन मोरेश्वर वंजारी यांनी केले. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान समन्वय समितीचे डॉ. मिलिंद वाचनेकर, विलास शेवाळे, डॉ. गौतम मोरे, अशोक जौहरी, शेषराव कुटे आदी उपस्थित होते.
सौजन्य: डॉ. दीपक शेंडेकर,संपर्क मित्र