घरकुल कामात अकोला जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानी

१०० कलमी कार्यक्रमात उद्दिष्टापेक्षा ८३ टक्के अधिक काम

    दिनांक :18-Apr-2025
Total Views |
अकोला,
Rural Housing Scheme शासनाच्या शंभर कलमी कार्यक्रमातंर्गत ग्रामीण गृहनिर्माण योजनांसाठी १०० दिवसीय उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. याअंतर्गत घरकुल पूर्ण करण्यात अकोला जिल्ह्याने १८३ टक्के काम करीत राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे. १०० दिवस कार्यक्रमात जिल्ह्याचे २ हजार ५१६ उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. जिल्ह्याने उद्दिष्टापलीकडे जाऊन एकूण ४ हजार६०० घरकुले पूर्ण केले आहेत. दरम्यान अकोला जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांक वर असताना रत्नागिरी पहिला, नागपूर तिसरा, रायगड चौथा तर भंडारा पाचव्या स्थानावर आहे.
 
 
a
 
अभियानात योजनेची प्रभावी अंमलबजावणी करताना घरकुलांना मंजुरी देणे, प्रथम हप्ता वितरित करणे, घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करणे, घरकुल बांधकाम पूर्ण करणे असे उपक्रम व उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. Rural Housing Scheme घरकुल योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना हक्काचे घर मिळणार असल्याने त्यांचे जीवनमान सुरक्षित आणि स्थिर होण्यासाठी जिल्हास्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली मनोज जाधव, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा प्रोग्रामर, जिल्हा ऑपरेटर यांच्या सह तालुकास्तरावर गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत, घरकुल ऑपरेटर गावस्तरावर सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामीण गृहनिर्माण अभियंता, रोजगार सेवक आदी परिश्रम घेत आहेत.