‘असू अम्ही सुखाने पत्थर पायातील’ चे लोकार्पण

    दिनांक :19-Apr-2025
Total Views |
नागपूर,
Nagpur News : ‘दिवंगत संघ प्रचारकांची जीवनककथा’ मालिकेत ‘असू आम्ही सुखाने पत्थर पायातील’ या शिर्षकांतर्गत रा.स्व. संघाचे प्रचारक दिवंगत निळूभाऊ त्रिवेदी यांच्या जीवनकार्याचा परिचय देणाèया व्हिडिओचे ज्येष्ठ प्रचारक प्रफुल्ल वैद्य तसेच पद्मश्री जाहीर झालेले ज्येष्ठ होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे यांच्यावरील लेखाच्या व्हिडिओचे लोकार्पण संस्कार भारतीच्या विदर्भ प्रांत अध्यक्ष कांचन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी झाले.
 
 
 
19apr3857
 
 
 
दक्षिण अंबाझरी मार्गावरील दी ब्लाईंड रीलिफ असोसिएशनच्या नवदृष्टी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला रा.स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक रवींद्र भुसारी, डॉ. विलास डांगरे, सेवासदनचे उपाध्यक्ष बापू भागवत, वासंती भागवत, ब्लाईंड रिलीफ असोसिएशनचे अध्यक्ष मकरंद पांढरीपाडे, अ‍ॅड. सुनील पाळधीकर प्रामुख्याने उपस्थित होते.
 
 
मिलींद रहाटगावकर यांनी प्रास्ताविकात सांगितले की, त्यांच्या ‘मला जे-जे भावते तेे सर्व’ या यू-ट्युब चॅनेलवर रा.स्व. संघाच्या शताब्दीनिमित्त संघाच्या प्रारंभिक काळातील दिवंगत प्रचारकांच्या कार्याची नव्या पिढीला माहिती व्हावी, या उद्देशाने ‘असू आम्ही सुखाने पत्थर पायातील’ शिर्षकांतर्गत रा.स्व. संघाचे प्रचारक दिवंगत निळूभाऊ त्रिवेदी यांच्यावर आधारित लेख डॉ. दिवंगत राजाभाऊ शिलेदार यांचा असून त्याचे अभिवाचन दीपाली घोंगे यांनी केले आहे. श्रद्धांजली गीत, संगीत व गायन शिरीष घारे यांचे आहे.
 
 
सुप्रसिद्ध होमिओपॅथ डॉ. विलास डांगरे यांचा जीवनपट उलगडून दाखविणारा लेख अ‍ॅड. सुनील पाळधीकर यांनी लिहिला असून त्याचे अभिवाचन मिलिंद रहाटगावकर यांनी केले आहे. दै. तरुण भारतचे निवृत्त मुख्य संपादक सुधीर पाठक, सागर कुळकर्णी, डॉ. छोटू भोयर, स्नेेहल पाळधीकर आदींसह अनेक नागरिक उपस्थित होते.