‘केसरी चॅप्टर २’ने पहिल्याच दिवशी कमावले ७.५० कोटी

जात’ आणि ‘सिकंदर’समोर कमजोर

    दिनांक :19-Apr-2025
Total Views |
मुंबई,
Kesari Chapter 2 बॉलिवूडमधील बहुप्रतिक्षित आणि चर्चित चित्रपटांपैकी एक असलेला ‘केसरी चॅप्टर २ : द अनटोल्ड स्टोरी ऑफ जालियनवाला बाग’ नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. Akshay Kumar अक्षय कुमार, R. Madhavan आर. माधवन आणि Ananya Panday अनन्या पांडे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असला, तरी बॉक्स ऑफिसवरील कमाई मात्र अपेक्षेप्रमाणे झाली नाही.
 
 

Kesari Chapter 2  
करण सिंग त्यागी दिग्दर्शित हा ऐतिहासिक कोर्टरूम ड्रामा प्रदर्शित होण्याच्या पहिल्याच दिवशी ७.५० कोटींची कमाई करू शकला. साकनिकच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, शुक्रवारी हिंदी ऑक्युपन्सी १७.४० टक्के इतकी होती. सकाळच्या शोमध्ये १२.६७ टक्के प्रेक्षक दिसले, तर दुपार आणि संध्याकाळच्या शोमध्ये ही टक्केवारी १९.७६ पर्यंत पोहोचली. म्हणजेच दिवसभरात प्रेक्षकवाढ नाममात्र राहिली.
अक्षय कुमारचा यापूर्वी रिलीज झालेला ‘स्काय फोर्स’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी १२.२५ कोटी रुपये कमावले होते. त्या तुलनेत ‘केसरी चॅप्टर २’ची सुरुवात कमकुवत ठरली आहे. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुरुवातीपासूनच मागे पडल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र खरा निकाल शनिवार आणि रविवारी लागेल, असे चित्रपट समीक्षकांचे मत आहे.दरम्यान, याच दिवशी प्रदर्शित झालेल्या ‘जात’ आणि ‘सिकंदर’ या चित्रपटांनी मात्र चांगली कमाई केली. ‘जात’ने ९.५ कोटींची कमाई केली, तर सलमान खानच्या ‘सिकंदर’ने तब्बल २६ कोटी रुपये गल्ला जमवला. त्यामुळे ‘केसरी चॅप्टर २’ या दोन चित्रपटांपुढे पिछाडीवर गेल्याचे दिसते.
 
 
 
 
जालियनवाला बाग हत्याकांड
 
 
‘केसरी चॅप्टर २’ Kesari Chapter 2 १९१९ मध्ये झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडावर आधारित आहे. अक्षय कुमार या चित्रपटात सी. शंकरन नायर या ब्रिटिशांविरोधात न्यायालयात लढणाऱ्या वकिलाची भूमिका साकारतो. आर. माधवन ब्रिटिश वकील नेव्हिल मॅककिन्लीच्या भूमिकेत आहेत, तर अनन्या पांडे पत्रकार दिलरीत गिलच्या भूमिकेत झळकते. ऐतिहासिक घटनांवर आधारित असूनही, चित्रपटाला अपेक्षित प्रतिसाद मिळतो का, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.