तेजस्विनी महिला मंचाची "हम है ना हमे दिजीये" ह्या मोहिमेची यशस्वी सुरुवात

    दिनांक :19-Apr-2025
Total Views |
नागपूर,
Tejaswini Women's Forum : तेजस्विनी महिला मंचाद्वारे सुरू केलेल्या "हम है ना हमे दिजीये" ह्या अंतर्गत नागपूर शहरात विविध भागात सुरू केलेल्या मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. काही नागरिक पूजेच्या वस्तूंचे मुख्यतः पीओपीच्या लक्ष्मीच्या मुर्त्या, धार्मिक फोटो, विविध कपडे, पुस्तका, पोथ्या इत्यादींचे विसर्जन न करता रस्त्याच्या कडेला मैदानात इतरत्र कुठेही कचऱ्यासारखे टाकून देतात, त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जातात. सखी मंचाच्या कार्यकत्या निस्वा: र्थपणे ते जमा करून त्यांचे विधिवत विसर्जन करतात. जर कुणी इतर भक्तांनी इच्छा व्यक्त केल्यास त्यांना देण्यात येतात अथवा पूर्ण आदरासह पुनर्वापर अथवा विल्हेवाट लावतात.
 

ngp 
 
 
तेजस्विनी सखी मंचाच्या सदस्यांचे नागरिकांना आव्हान करण्यात आले, की पीओपीच्या मूर्तीची स्थापना न करता तांब्याच्या अथवा इतर धातूच्या मूर्तींची स्थापना करून पूजा करावी जेणेकरून दरवर्षी विसर्जन करावे लागणार नाही. तसेच नागरिकांना आव्हान करण्यात आले की धार्मिक वस्तू इतरत्र टाकून न देता आम्हाला द्या आम्ही आहोत.
 
ह्या मोहिमेला नागपूरच्या विविध भागात जसे कल्याणेश्वर शिव मंदिर महाल, माता मंदिर मानस चौक, आज्ञाराम देवी मंदिर गणेश पेठ, सार्वजनिक दुर्गा माता मंदिर नेताजी नगर, माता मंदिर धरमपेठ, जैसाववाडी शिव मंदिर जूनी मंगलवारी, गणपति मंदिर तात्या टोपे नगर, रजत संकुल - बस स्टेंड, सरजु टाउन- वाठोडा माता मंदिर छावनी, हनुमान मंदिर सदर, हनुमान मंदिर, लाड़ेकर ले आउट ह्या सोबत दगड़ी पार्क रामदास पेठ, शिवाजी नगर गार्डन शिवाजी नगर इत्यादी ठिकाणी संकलन केंद्रात छान प्रतिसाद मिळाला. तेजस्विनी मंचाच्या सदस्यांनी मोहिमेच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. 
 
 
सौजन्य: अर्चना सोनकुसरे, संपर्क मित्र