कालव्याच्या खचलेल्या भिंतीमुळे शेतकऱ्यांचा रस्ता झाला बंद

    दिनांक :19-Apr-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
बाभुळगाव, 
canal walls crumbling : बेंबळा नदी प्रकल्पाच्या मुख्य कालव्याची भिंत गिमोणाजवळ एका ठिकाणी खचत चालली आहे. त्यामुळे भिंती लगत असलेल्या शेतकèयांचा शेतात जाण्याचा रस्ताच बंद झाला आहे. यावर त्वरीत उपाय करून भविष्यात होणारे मोठे नुकसान टाळावे अशी मागणी शेतकèयांनी केली आहे.
 
 
 
y19Apr-Rastaa
 
 
 
कालव्याची भिंत हळूहळू खाली सरकत असून त्यावरील झाडेसुद्धा वाकली आहेत. येणाèया पावसाळ्यात ही भिंत पूर्णपणे खचून शेतकèयांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र दुरुस्तीच्या नावाखाली पाटबंधारे विभाग, बेम्बळा कालवे विभाग, निम्न पैनगंगा कालवे (प्रकल्प) विभाग, बेंबळा प्रकल्प विभाग असे सर्वच विभाग आपल्यावरची जबाबदारी झटकत आहेत. सुमारे तीन किमी लांबीचा मुख्य कालवा गिमोणाजवळून पुढे गेला आहे. या कालव्यालगत अंबादास जांभुळकर व इतर शेतकèयांचे शेत आहे. शेताजवळची भिंत खालून वाहत असलेल्या नाल्यामध्ये हळूहळू खचत चालली आहे. त्यामुळे शेतकèयांसाठी असलेला रस्ता पुर्णपणे बंद झाला आहे.
 
 
मुख्य कालव्याला सिंचनासाठी पाणी सोडल्यानंतर याच ठिकाणाहून पाणी झिरपून त्या नाल्यामध्ये साचते. त्यामुळे मुख्य कालव्याला आतमधून भगदाड पडल्याचा अंदाज शेतकरी व्यक्त करीत आहेत. पावसाळ्यात ही भिंत आणखीन खचत जाण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.
 
 
प्रकल्पातून कालव्याला पाणी सोडल्यास मुख्य कालवा फूटून शेतकèयांच्या शेतात पाणी शिरून शेतजमीनीचे तलावात रूपांतरीत होऊन मोठे नुकसान होईल, अशी भिती शेतकरी व्यक्त करीत आहेत. कोणत्याच विभागाने कालव्याच्या खचलेल्या भिंतीची दुरुस्ती न केल्याने या प्रकाराबाबत तहसीलदारांना निवेदन देवून उपाययोजना करण्याची मागणी करणार असल्याचे शेतकèयांनी सांगितले आहे.