नागपूर,
highest temperature मागील काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असून, संपूर्ण विदर्भ होरपळत आहे. शनिवारी नागपुरात ४४.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. Nagpur शुक्रवारच्या तुलनेत तापमानात तब्बल १.७ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. राज्यात शनिवारी सर्वाधिक तापमान नागपुरातच नोंदवण्यात आले.
उन्हाचा तडाखा
शुक्रवारी नागपुरात highest temperature कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस होते. हवामान विभागाने यापूर्वीच १९ आणि २० एप्रिलसाठी विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता. त्यानुसार तापमानात चांगलीच वाढ झाली असून रविवारीही ही लाट कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागपूरकरांची उन्हाची झळ आणखी वाढणार आहे.नागपूरनंतर अकोला (४४.३), वर्धा (४४.०) आणि चंद्रपूर (४४.०) अंश सेल्सिअस कमाल तापमानासह उष्णतेत होरपळले. संपूर्ण विदर्भातच प्रचंड गरमी जाणवत असून, उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्यान, पुढील काही दिवस उन्हाचा तडाखा असाच राहणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.