तरुण भारतच्या मुख्य संपादकपदी शैलेश पांडे

20 Apr 2025 15:33:14
नागपूर,
Shailesh Pandey : तरुण भारतच्या मुख्य संपादकपदी ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक शैलेश पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तरुण भारतचे विद्यमान मुख्य संपादक गजानन निमदेव यांची राज्याच्या विभागीय माहिती आयुक्तपदी निवड झाली आहे. शैलेश पांडे सोमवारपासून मुख्य संपादकपदाचा कार्यभार सांभाळतील.

PANDE SIR
 
 
 
शैलेश पांडे गेल्या साडेतीन दशकांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांनी अनेक दैनिकांमध्ये विविध पदांवर कार्य केले आहे. त्यांनी चार पुस्तके लिहिली असून, त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. पत्रकारिता क्षेत्रातील सन्मानही त्यांनी प्राप्त केले आहेत. उत्तम लेखक आणि वक्ता असलेले शैलेश पांडे त्यांच्या शैतीदार लेखनासाठी ओळखले जातात, मराठीसह इंग्रजी आणि हिंदीतही ते लिहितात. त्यांनी जनसंवाद शास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे तसेच कायद्याची पदवी प्राप्त केली आहे.
 
 
सद्यः स्थितीत ते तरुण भारत डिजिटलचे संपादक म्हणून कार्यरत आहेत. आज. शुक्रवारी तरुण भारतमध्ये झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात शैलेश पांडे यांची मुख्य संपादकपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेचे प्रबंध संचालक धनंजय बापट यांनी केली. यावेळी श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेवे अध्यक्ष डॉ. विलास डांगरे, कार्याध्यक्ष अनित दांडेकर, संचालक अशोक मानकर, मुख्य संपादक गजानन निमदेव उपस्थित होते. गजानन निमदेव पेत्या सोमवारी मुंबई पेधीत राजभवनात माहिती आयुक्तपदाची शपथ घेणार आहेत.
'शतायुषी' विशेषांकाचे प्रकाशन
 

NGP
 
 
 
पाच कार्यक्रमात तरुण भारतच्या 'शतायुषी' या आरोग्य विषयक विशेषांकाचे प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष डॉ. विलास डांगरे यांच्या हस्ते करण्यात आले. हा विशेषांक विविध उपचार पद्धतींवर आधारित आहे. पात शहरातील नामांकित डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांचे माहितीपूर्ण लेख प्रकाशित करण्यात आले आहेत.
Powered By Sangraha 9.0