सिंचन विहिरीचे रखलेले अनुदान मंजूर करा: छाया राठोड

    दिनांक :21-Apr-2025
Total Views |
मानोरा,
Chhaya Rathod तालुयातील रोजगार हमी योजनेअंतर्गत सन २०२३ -२४ या आर्थिक वर्षात मंजूर झालेल्या सिंचन विहिरीच्या कुशल व अकुशलच्या प्रलंबित अनुदानासाठी लाभार्थी शेतकरी व मजूर वर्ग पंचायत समिती कार्यालयाच्या पायर्‍या झिजत आहेत. रोजगार हमी योजना ही आता डोकेदुखी बनली असल्याची प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून उमटत आहे.
 

dfhdfhd 
 
सिंचन विहिरीसाठी ५ हजार शेतकर्‍यांनी अर्ज केले आहे. त्यातील १ हजार ७०० च्या जवळपास विहिरीचे खोदकाम झाले असून, ४०० विहिरीचे बांधकाम आहे झाले आहे.या विहिरीच्या अनुदानासाठी स्थानिक रोजगार सेवक यांनी पंचायत समिती कार्यालयात मागील ४ ते ५ महिन्यांपूर्वी जमा केलेल्या मस्टरचे कोट्यावधीचे अनुदान प्रलंबित असून हे अनुदान तात्काळ मंजूर करून वितरण करण्याची मागणी पंचायत समितीच्या माजी पंस सदस्या छाया राठोड यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात राठोड यांनी मानोरा तालुयात सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात रोजगार हमी योजने अंतर्गत मंजूर झालेल्या सिंचन विहिरीचे अनुदान प्रलंबित असून, यात कुशल व अकुशल असे दोन्ही कामाचे कोट्यावधीचे अनुदान प्रलंबत आहे.Chhaya Rathod मागील वर्षे भरापासून या सिंचन विहिरीचे बिले थकीत असल्याने शेतकर्‍यांनी उदार व उसनवारीने आणलेले पैसे फेडावे कसे या विवेचनात शेतकरी असून अनेक शेतकर्‍यांनी शेती गहाण ठेवून विहिरीचे खोदकाम व बांधकाम केलेले आहे.तालुयातील शेतकरी विहिरीच्या अनुदानासाठी पंचायत समिती कार्यालयात चक्कर मारून मारून थकले आहेत तेव्हा येत्या आठ दिवसात या सिंचन विहिरीचे अनुदान मंजूर न केल्यास सिंचन विहिरीचे पात्र लाभार्थ्यासह रोजगार हमी कार्यालयास ताला ठोकण्याचा इशारा छाया राठोड निवेदनात नमूद केले आहे.