आज उल्कावर्षाव...कोणत्या वेळी दिसणार वाचा माहिती

21 Apr 2025 14:46:37
नवी दिल्ली,
Lyrid meteor shower 2025 आज आकाशात उल्कावर्षाव होणार असून शेकडो तारे पडताना दिसणार आहे. एप्रिलमध्ये तुम्हाला एक अद्भुत दृश्य पाहायला मिळणार आहे जेव्हा लायरिड्स उल्का आकाशातून पडतील. लिरिड्स प्रत्यक्षात लिरा नक्षत्रातून येतात. हे नक्षत्र वेगा नावाच्या ताऱ्याजवळ आहे. हे उघड्या डोळ्यांनी पाहता येतात आणि त्यासाठी दुर्बिणीची आवश्यकता भासणार नाही. लिरिड्स उल्कावर्षाव हा ज्ञात असलेल्या सर्वात जुन्या उल्कावर्षावांपैकी एक आहे. ते २७०० वर्षांपूर्वी नोंदवले गेले होते.
 
 

Lyrid meteor shower 2025 
 
लायरिड्स हे कॉमेट थॅचर (C/1861 G1) नावाच्या धूमकेतूचे अवशेष आहेत. हा धूमकेतू दर ४१५ वर्षांनी सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. धूमकेतू आपल्या मागे धुळीचा ढग सोडतो. या धुळीपासून जेव्हा त्याचे तुकडे वेगाने जातात आणि पृथ्वीच्या वातावरणाशी आदळतात तेव्हा ते तेजस्वी प्रकाश निर्माण करतात. Lyrid meteor shower 2025 नासाच्या मते, हा उल्कावर्षाव १९ एप्रिलपासून सुरू होईल जेव्हा रात्रीच्या काळोख्या आकाशात उल्का पडताना दिसतील. पण सुरुवातीच्या टप्प्यात ते मंद असेल. त्यानंतर २१, २२ एप्रिल रोजी ते शिखरावर असेल. २२ एप्रिल रोजी जास्तीत जास्त उल्का पडताना दिसतील. पहाटे ३ ते पहाटे ५ वाजेपर्यंत हे दृश्य पाहता येईल. उल्कावर्षाव २९ एप्रिलपर्यंत चालेल आणि नंतर थांबेल. लिरिड उल्कावर्षाव पहिल्यांदा चीनमध्ये इसवी सनपूर्व ६८७ मध्ये दिसून आले होते.
 
 
दर तासाला शेकडो उल्का पडतील
नासाच्या मते, लिरिड उल्कावर्षावाच्या शिखर वेळेत दर तासाला किमान १८ उल्का पडत असल्याचे दिसून येते. त्यांचा वेग ताशी २९ मैलांपर्यंत आहे. असे म्हटले जाते की त्यांची कमाल संख्या प्रति Lyrid meteor shower 2025 तास १०० उल्कांपर्यंत जाऊ शकते. १८०३ मध्ये व्हर्जिनियामध्येही असेच दृश्य दिसले होते. याशिवाय १९२२ मध्ये ग्रीसमध्येही असेच काहीसे दिसले होते. १९४५ मध्ये जपानमध्ये आणि १९८२ मध्ये अमेरिकेत असे उल्कावर्षाव दिसले होते.
Powered By Sangraha 9.0