26/11 Mumbai Attacks : शहीद अंबादास पवार यांची पत्नी झाली पोलीस उपअधीक्षक

    दिनांक :22-Apr-2025
Total Views |
मुंबई,
26/11 Mumbai Attacks : पोलिस शिपाई अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना पवार यांना परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक पदी नियुक्ती देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पवार यांना परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक पदावरील थेट नियुक्तीचे आदेश प्रदान केले.
 

pawar
 
 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या पोलीस शिपाई अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना पवार यांना परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षकपदावरील थेट नियुक्तीचे आदेश प्रदान करण्यात आले. ही नियुक्ती करताना मुख्यमंत्री यांनी शहीद पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी असलेली शासनाची कृतज्ञता आणि संवेदनशीलता पुन्हा एकदा प्रत्यक्ष कृतीतून दाखवली आहे.
मुख्यमंत्री यांच्या या निर्णयाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना कल्पना पवार म्हणाल्या, “माझ्या पतीप्रमाणेच मलाही आता देशसेवेची संधी मिळाली आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, लाडक्या बहिणींचे आणि देशाच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या शहीद वीरांचे आहे, हे माझ्या या नियुक्तीतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.”
 
 
 
 
 
26/11 Mumbai Attacks: त्या रात्री काय घडले?
26 नोव्हेंबर 2008 रोजी पाकिस्तानमधून काही दहशतवादी समुद्राच्या मार्गे मुंबईत शिरले होते. सुरूवातीला झालेल्या गोळीबारानंतर हा गँगवॉरचा प्रकार असल्याचा अंदाज पोलिसांनी लावला, नंतर मात्र हा दहशतवादी हल्ला असल्याचं लक्षात आलं. या हल्ल्यामध्ये मुंबई पोलिसांचे काही धाडसी अधिकारी शहीद झाले.
 
लष्कर ए तोयबाच्या या अतिरेक्यांनी मुंबईच्या ताज हॉटेलसह सहा ठिकाणी हल्ला केला होता, ज्यात 160 हून अधिक निरपराधांचे प्राण गेले होते. यात आठ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. तर अजमल कसाब याला पोलिसांनी आपल्या जीवाची बाजी लावून जिवंत पकडलं होतं.
 
26 नोव्हेंबर रोजी मुंबईतील कामा रुग्णालयाजवळ एटीएस प्रमुख हेमंत करकरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे आणि पोलीस निरीक्षक विजय साळसकर यांच्या हत्येनंतर कसाब आणि त्याच्या दहशतवादी गटाने एक स्कोडा कार हायजॅक केली. ती कार मलबार हिलच्या दिशेने जात होती. या कारला थांबवण्यासाठी डीबी मार्ग पोलिसांच्या एका टीमने गिरगाव चौपाटीवर नाकाबंदी केली. या नाकाबंदीवर कार थांबण्याचे आदेश देण्यात आले होते.
 
कार थांबवण्यासाठी पोलीस कर्मचारी पुढे सरसावल्यानंतर कसाबने आपल्या एके 47 रायफलने पोलिसांवर फायरिंग केली. यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम ओंबाळे आणि इतर पोलिसांनी कसाबला पकडण्याचा प्रयत्न केला. तुकाराम ओंबळे न डगमगता निर्भयपणे कसाबवर तुटून पडले यावेळी झालेल्या गोळीबाराच तुकाराम ओंबाळे शहीद झाले आणि पोलीस निरीक्षक संजय गोविळकर जखमी झाले. पोलीस निरीक्षक हेमंत बावधनकर यांनी ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या इस्माईल या दहशतवाद्याला ठार केलं आणि कसाबला जिवंत पकडलं.