हिंगणघाट,
Adv. Kothari राज्यामध्ये जागतिक बँक अर्थ सहाय्यीत मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत बाजार समित्यांची त्यांचे कामगिरीच्या आधारावर वार्षिक क्रमवारीत हिंगणघाट बाजार समितीने राज्यातून प्रथम क्रमांक पटकटावत हिंगणघाटच्या इतिहासात मानाचा तुरा खोचलेला आहे. सन २०२१-२२ पासून पणन संचालनालयामार्फत राज्यातील बाजार समितीची गुणवंत्ता तपासण्यात येते. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये समितीला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला होता. त्यावेळेस समितीला २०० पैकी १६१ गुण प्राप्त झाले होते. त्यावेळी समितीने आपण कुठे कमी पडलो व कोण कोणत्या गोष्टीची आपण पूर्तता करू शकतो याचा निर्धार करून निकषाकरिता जागतिक बँक व पणन विभागाने निर्धारित केलेले गुण लक्षात घेऊन निकषाची पूर्तता करून गुण वाढविण्याच्या दृष्टीने आवश्यक सुधारणा करायच्या व हिंगणघाट बाजार समितीला प्रथम क्रमांक मिळण्याच्या दृष्टीने कामकाजात सुधारणा करण्यात आली.

सन २०२३-२४ या वर्षाच्या वार्षिक क्रमवारीच्या कार्यपद्धतीत कोणतीही त्रुटी राहू नये या दृष्टीने समितीने तालुकास्तरावर अधिक वस्तूनिष्ठ माहिती आवश्यक त्यापुराव्यासह २०० पैकी १८२ गुणांचा प्रस्ताव तालुकास्तरीय समितीकडे सादर केला होता. समिती मार्फत सादर केलेल्या प्रस्तावाची प्रथम पडताळणी तालुकास्तरीय समितीने केली. Adv. Kothari तालुकास्तरीय समितीने सादर केलेल्या प्रस्तावाची पडताळणी जिल्हास्तरीय समितीमार्फत करण्यात येऊन सदर प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीने पणन संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडे पाठविण्यात आला होता.
त्याअनुषंगाने नुकतीच तालुका व जिल्हास्तरीय समितीने पडताळणी केलेल्या माहितीनुसार व गुणांकन पद्धतीनुसार प्राप्त झालेल्या गुणांकनाच्या आधारे राज्यातील ३०५ बाजार समित्यांची सन २०२३-२४ या वर्षाची वार्षिक क्रमवारी पणन संचालनालयाद्वारे जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये बाजार समित्यांची वार्षिक क्रमवारी निश्चित करण्यासाठी ठरविण्यात आलेल्या विविध निकषांसाठी दिलेल्या २०० गुणांपैकी हिंगणघाट बाजार समितीला सर्वात जास्त म्हणजेच १७८ गुण प्राप्त झालेले आहे. Adv. Kothari त्यामुळे हिंगणघाट बाजार समिती राज्यातून प्रथम क्रमांकावर आहे. बाजार समितीला पायाभूत सुविधा व इतर सेवा सुविधा निकषामध्ये ८० पैकी ७० गुण, आर्थिक निकषामध्ये एकूण ३५ पैकी ३५ गुण, वैधानिक कामकाज निकषामध्ये ५५ गुणांपैकी ५० तर इतर निकषामध्ये ३० गुणांपैकी २३ गुण असे २०० पैकी १७८ गुण प्राप्त झाले आहे. प्रथम क्रमांक प्राप्त झाल्यानंतर सभापती अॅड. सुधीर कोठारी यांनी सर्वांच्या सहकार्यानेच कोणतेही काम पुर्णत्वास जाऊ शकते, यावर आपला विश्वास ठाम झाला असल्याची प्रतिक्रिया दिली.