काश्मीरची सहल डोंबिवलीच्या तीन भावंडांसाठी ठरली अखेर!

23 Apr 2025 16:51:36
डोंबिवली,
Dombivali's brothers death काळ जम्मू-काश्मिरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. त्यांनी केलेला गोळीबारात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश असून डोंबिवलीमधील ३ मावसभावंडांचा मृत्यू झाला. माहितीनुसार, डोंबिवली पुर्व पश्चिम शहरातील नवापाडा, पांडुरंग वाडी आणि नांदिवली परिसरात राहणाऱ्या ३ जणांचा मृत्यू झाला आहे. हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने असे त्यांचे नाव असून हे तिघेही मावसभाऊ असल्याचे समोर आले आहे. महत्त्वाचे म्हणजे मृतकांमधील संजय लेले हे शिवेसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांचे मेहुणे असल्याचे समोर आले आहे.
 

Dombivali 
 
हे तिघेही काश्मिरमध्ये फिरण्यासाठी गेले होते. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता, त्यावेळी त्यामध्ये तिघेही जखमी झाले होते. उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला. संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेले ह्याच्या हाताच्या बोटाला गोळी घासून गेली, बाकी सर्व कुटुंबीय सुखरुप अशी माहिती राजेश कदम यांनी दिली. दुसरीकडे काश्मीर हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांचा मृत्यू झाला आहे. Dombivali's brothers death पुण्यातील आसावरी जगदाळे, प्रगती जगदाळे, संतोष जगदाळे, कौस्तुभ गणबोटे, संगीता गणबोटे हे नागरिक काश्मीरला फिरायला गेले. यातील जगदाळे कुटुंबीय हे कर्वेनगर परिसरात राहणारे आहेत. तर गणबोटे कुटुंबीय हे पुण्यातील रास्ता पेठेतील आहेत. तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
Powered By Sangraha 9.0