गर्भवती मैत्रीण पोहोचली विवाहित मित्राच्या घरी

तक्रारीवरून अत्याचाराचा गुन्हा दाखल

    दिनांक :24-Apr-2025
Total Views |
नागपूर,
Nagpur गर्भवती झाल्यानंतर तिने लग्नासाठी तगादा लावला. थेट त्याच्या घरी पोहोचली. समोरचे दृश्य पाहून तिच्या पायाखालची वाळू सरकली. कारण तो विवाहित निघाला. एवढेच काय तर त्याला दोन मुलीसुद्धा आहेत. पीडितेच्या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी विवाहित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. आशीष (33) रा. नंदनवन असे आरोपीचे नाव आहे.
 
 
Nagpur
 
पीडित 25 वर्षीय ही विवाहित असून, पतीशी पटत नसल्यामुळे ती माहेरी आली. त्यानंतर ती वाठोड्यात राहणाऱ्या बहिणीच्या घराशेजारी खोली करून राहायला लागली. तिने एका मोठ्या हॉटेलमध्ये वेटर म्हणून नोकरी स्वीकारली. त्याच हॉटेलमध्ये आशीष हा स्वयंपाकी (कूक) म्हणून काम करीत होता. सप्टेंबर 2024 मध्ये दोघांची ओळख झाली. काही दिवसांतच दोघांमध्ये सूत जुळले. आशीष आणि पीडितेच्या मैत्रीची चर्चा कुटुंबीयांपर्यंत पोहोचली. आशीषने तिला लग्नाचे आमिष दाखवले. Nagpur मात्र, विवाहित असल्याचे त्याने लपवून ठेवले. तीन महिन्यांची गर्भवती असल्यामुळे तिने आशीषकडे लग्नाचा तगादा लावला. मात्र, आशीष टाळाटाळ करीत होता. पीडिता आशीषचा पाठलाग करीत त्याच्या घरापर्यंत पोहोचली. त्याचा पत्नी व दोन मुलींसह संसार असल्याचे लक्षात आले. तिने घरात घुसून त्याला जाब विचारला. त्याने तिला पुन्हा लग्नाचे आमिष दाखवले. मात्र, यावेळी पीडिता त्याच्या जाळ्यात आली नाही. तिने पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली. पोलिसांनी लगेच गुन्हा दाखल करून आशीषला अटक केली. न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.