रांची,
Mohammad Naushad Arrested जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे सोशल मीडियावर खुलेआम कौतुक केल्याप्रकरणी मोहम्मद नौशाद या तरुणाला झारखंडच्या बोकारो जिल्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्याने 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाकिस्तान व लष्कर-ए-तैयबाचे समर्थन करणारी पोस्ट केल्याचा आरोप आहे.
या वादग्रस्त पोस्टनंतर देशभरात संतापाची लाट उसळली. संबंधित प्रकरणात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, नौशादला बलिदीह पोलिसांनी मखदुमपूर मिल्लत नगर येथील राहत्या घरातून अटक केली.
पोलिस तपासात Mohammad Naushad Arrested समोर आले आहे की, नौशाद सोशल मीडियावर सतत देशविरोधी पोस्ट करत होता. तो दुबईत राहणाऱ्या आपल्या भावाच्या नावाने मिळवलेल्या सिम कार्डचा वापर करत होता. त्याचद्वारे एक्स, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सक्रिय राहून देशविरोधी विचार पसरवत होता.२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्याने एका पोस्टमधून पाकिस्तान आणि दहशतवादी संघटनेचे उघडपणे कौतुक केले. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिस यंत्रणा सतर्क झाली. बोकारो एसपींनी तात्काळ एसआयटी स्थापन करून कारवाईचे आदेश दिले.नौशादचा संबंध बिहारमधील दरभंग्याशी असून तो अनेक वर्षांपासून बोकारोमध्ये राहत होता. त्याचे वडील बीएसएलमधून निवृत्त झाले आहेत. नौशादने देवबंदसह विविध ठिकाणी धार्मिक शिक्षण घेतले असून तो मुफ्ती म्हणून काम करत होता.दरम्यान, झारखंड एटीएस नौशादची चौकशी करत आहे. पाटणा गांधी मैदानातील साखळी बॉम्बस्फोटांशी त्याचा काही संबंध आहे का, याचाही तपास सुरू आहे. झारखंडचे डीजीपी अनुराग गुप्ता यांनी स्पष्ट केले की, देशद्रोहासारख्या गंभीर प्रकरणात कोणतीही गय केली जाणार नाही.