शॉर्ट सर्कीटमुळे शेतातील गोठा जळाला

    दिनांक :25-Apr-2025
Total Views |
तळेगाव,
Farm barn fire आष्टी तालुयातील लहान आर्वी येथील आनंद आकोलकर यांच्या चेकबंदी मौजा येथील शेतातील गोठ्याला आग लागली. गोठ्यात असलेले शेतीपयोगी साहित्य जळाल्याने शेतकर्‍याचे नुकसान झाले. मिळालेल्या माहितीनुसार, आकोलकर यांच्या शेतात संत्राची बाग असून शेती उपयोगी सामान ठेवण्यासाठी गोठा बांधला आहे. दुपारी गोठ्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. त्यात अल्पभुधारक शेतकरी आनंद आकोलकर यांचे दोन लाख रुपयाचे नुकसान झाले. आनंद आकोलकर यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
 
 ए