आपले सरकारच्या सेवेत दुप्पट वाढ

25 Apr 2025 20:18:04
हिंगणघाट,
Maha-e-Seva Kendra राज्य शासनाच्या वतीने महा-ई-सेवा केंद्रांमार्फत नागरिकांना ऑनलाईन दिल्या जाणार्‍या प्रमाणपत्राकरिता मोठ्या प्रमाणात दर वाढ करण्यात आली. या दरवाढीचा फटका सर्व सामान्यांच्या खिशावर पडणार आहे. महा-ई-सेवा केंद्राच्या वतीने वितरीत करण्यात येणार्‍या जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्रे किंवा प्रतिज्ञापत्रे यासारख्या सेवा शुल्कामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली असून सर्व सामान्यांच्या खिशाला दुपटीने कात्री लागणार आहे.
 
 
३
 
राज्य शासनाच्या महा-ई-सेवा या ऑनलाइन प्रणालीवरून अनेक प्रकारचे विविध शासकीय निमशासकीय कामाकरिता नागरिकांना आभासीरीत्या अर्ज करावा लागतो. यामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेशाकरिता जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, शेतकर्‍यांना शेतीचा सातबारा व राजपत्र प्रकाशन अशी विविध प्रकारचे कामे या महा-ई-सेवा केंद्रावरून केली जातात. या केंद्रांवर रहिवाशी राष्ट्रीयीत्व प्रमाणपत्राकरिता शासनाकडून ३३ रुपये शुल्क आकारले जायचे आता ६९ रुपये दराने आकारले जाईल, जातवैधता प्रमाणपत्राकरिता जुने दर ५७ रुपये होते आता याकरिता थेट १२८ रुपये वसूल करण्यात येईल. Maha-e-Seva Kendra आजपासून या इ महा सेवाकेंद्रावरून आभासी पद्धतीच्या अपडेटच्या दरामध्ये राज्य सरकारकडून मोठी वाढ करण्यात आली असून यामुळे विविध अपडेटवर आता लाभार्थ्यांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे. शेतकरी, कामकरी, विद्यार्थी, महिलांना आता सेतुमार्फत कोणतेही प्रमाणपत्र मिळविताना दामदुप्पट रक्कम मोजावी लागणार आहे.
Powered By Sangraha 9.0