पालकमंत्री डॉ. पंकज भोयर उद्या वर्धेत

26 Apr 2025 21:43:32
वर्धा, 
Pankaj Bhoyar : जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर हे रविवार २७ रोजी जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून भाजपाच्या गाव वस्ती संपर्क अभियानात सहभागी होणार आहेत.
 

pankaj 
 
 
 
२६ व २७ रोजी गाव वस्ती संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातंर्गत ना. भोयर रविवारी सकाळी ८.३० वाजता प्रतापनगर येथील गजानन महाराज मंदिर परिसरात स्वच्छता अभियान, नागरिकांशी संवाद साधणार आहे. ९.४५ वाजता माजी नगरसेवक व भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रदीप ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट, १० वाजता भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी रमेश महल्ले, माधव कोटस्थाने यांच्या घरी भेट, १०.३० वाजता श्रीनिवास कॉलनी येथील शहर वर्धिनी आरोग्य केंद्रास भेट, ११ वाजता मंगेश मांगलेकर यांच्या निवासस्थानी मन की बात कार्यक्रमाला उपस्थित राहतील. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, शहर अध्यक्ष निलेश किटे व पदाधिकारी उपस्थित राहतील.
 
 
याशिवाय भाजपा कार्यलयात बैठकीस उपस्थित राहतील. दुपारी १२ वाजता सावंगी येथील दत्ता मेघे ऑडिटोरीयम येथे आयोजित नृत्य स्पर्धा कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी १ ते सायंकाळी ४ पर्यंत प्रशासकीय कामकाजासाठी वेळ राखीव राहील. सायंकाळी ५ वाजता पालोती येथे जनता दरबार व संपर्क अभियानात सहभागी होतील.
Powered By Sangraha 9.0