जिल्हा नागरी व पगारदार सेवकांच्या सहकारी पतसंस्था संघाच्या अध्यक्षपदी राधेश्याम चांडक

26 Apr 2025 21:39:16
बुलढाणा, 
Radheshyam Chandak : बुलडाणा जिल्हा नागरी व पगारदार सेवकांच्या सहकारी पतसंस्था संघ म. बुलडाणा र. न. ११४ ह्या संघाच्या व्यवस्थापन समितीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार झाली. यामध्ये संघाचे अध्यक्ष म्हणून राधेश्याम चांडक यांची सातव्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली.
 

bul 
 
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक, बुलडाणा जी.जे. आमले, यांनी काम पाहिले.बुलडाणा जिल्हा नागरी व पगारदार पतसंस्था संघाची स्थापना ११ मार्च १९९१ रोजी स्थापना करण्यात आली. या संघाच्या ३२० पतसंस्था सभासद आहेत. संघ हा जिल्ह्यातील पतसंस्थांना विविध प्रकारच्या सेवा पुरवीत आहे. भाईजी यांच्या नेतृत्वात संघाने आतापर्यंत दैदिप्यमान कामगिरी करून राज्यामध्ये सर्वोत्कृष्ठ संघ म्हणून बुलडाणा जिल्हा पतसंस्था संघाला ओळख निर्माण करून दिली आहे.
 
 
 
संघाचे २०२५ ते २०३० या कालावधीची पंचवार्षिक निवडणूक अविरोध पार पडली यावेळी संघाचे उपाध्यक्ष म्हणून सौ. स्वातीताई वाकेकर व मानद सचिव म्हणून सुरेंद्रप्रसाद पांडे यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच नवनिर्वाचित संचालक गोविंद मापारी, पंडितराव देशमुख, मंगेश व्यवहारे, मख्खनलाल मुंदडा, स्वाती अनिल कन्हेर, शंकर सकळकर, दीपक देशमाने, सतीश कायंदे आदींची निवड करण्यात आली. यानंतर पदाधिकार्‍यांची निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर प्राधिकृत निर्णय अधिकारी जी. जे. आमले यांनी सर्व निर्वाचित पदाधिकारी व संचालक यांचा सत्कार करीत संघाच्च्या उज्वल कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.
Powered By Sangraha 9.0